शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

ईदची नमाज सामुहिक ऐवजी यंदा प्रथमच होणार घराघरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर असलेले लॉकडाउन व संचारबंदी पाहता यंदा मुस्लीम समाज बांधवांना रमजान इदची नमाज ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर असलेले लॉकडाउन व संचारबंदी पाहता यंदा मुस्लीम समाज बांधवांना रमजान इदची नमाज सामुहिकपणे अदा करता येणार नसल्याचे चित्र आहे. प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली आहे. रमजानच्या पवित्र पर्वाची सांगता रविवारी किंवा सोमवारी होणार आहे.रमजान मासास इस्लाम धर्मात अनन्य साधारण असे महत्व आहे. एक महिन्याचे उपवास करुन अल्लाहला राजी करण्याचा प्रयत्न या महिन्यात मुस्लिम समाजबांधव करीत असतात. बालकांपासुन वयोवृध्द अश्या सर्व वयोगटातील नागरिक रोजा करुन पाचही वेळची नमाज कसोशीने अदा करतात. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पाचपेक्षा जास्त लोकांचे एकत्रित येणे हितावह नसल्याने पहिल्यांदा रमजान महिन्यात रात्रीच्या वेळेस समाजबांधव एकत्रित येउन अदा होणारी तरावीहची नमाज अदा करता आली नाही.कोरोनामुळे सामाजिक दुरी ठेवणे आवश्यक असल्याने यंदा संपुर्ण दिवसातील पाचवेळची नमाज समाजबांधवांकडुन घरीच अदा करण्यात आली. इतर सर्व सोपस्करही घरात राहुनच पार पाडुन अल्लाहला राजी करण्याचा व कोरोनाच्या जिवघेण्या संकटापासुन जगाला मुक्त करण्यासाठी घराघरातुन प्रार्थना करण्यात आली.चंद्रदर्शन पासुन सुरुवात होणार्या या मासाची सांगता देखील चंद्रदर्शनानेच होते. चंद्रदर्शनास यामुळे खुप महत्व आहे. २९ उपवासानंतर होणारे चंद्रदर्शन काही ठिकाणी होते व काही ठिकाणी होत नाही. मासातील ३० उपवास पुर्ण झाल्यास चंद्रदर्शन होवो किंवा न होवो, ईद साजरी होतेच. मात्र २९ रोजे पुर्ण झाल्यावर साजरी होणारी ईद पुर्णत: चंद्रदर्शनावरच अवलंबुन असते. प्रत्येक शहराला लागुन असलेल्या ईदगाह मैदानावर एकत्रित येऊन ईदची नमाज अदा करण्याची पुवार्पार परंपरा आहे. यंदा सामुहिकपणे ईदची नमाज देखील अदा होणार नसल्याने चिंता वाढल्या आहेत. लॉकडाउनच्या धर्तीवर यंदा या सर्व बाबी शक्य नसल्याने उत्साहावर विरजण पडले आहे. ईदच्या नमाजमधे कुतबारुपी परमेश्वराच्या संदेशाचे वाचन करण्याची परंपरा पैगंबरांपासुन सुरु असल्याने कुतबा ईदच्या नमाजमधील अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला कुतबा पठण करणे अवघड असते. हाफेज, मुफ्ती व आलीम दर्जाचे आगेवान हे कार्य पार पाडतात. या सर्व बाबी एकत्रितपणे नमाज अदा करण्यावेळी शक्य होते.