लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मुस्लीम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद-ए- मिलाद म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील विविध मशिदीच्यावतीने रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कुकडेल भागात असलेल्या जामा मशिदीपासून रॅली व झाकी शांततेत काढली.मोहम्मद पैगंबरसाहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शहरातील शाही मशीद कुकडेल, जामा मशीद, रजा गरीब मशीद, नुर ए ईलाही मशीद, गरीब नवाज मशीद, मेमन मदिना मशिद आदी मशीदींजवळ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कुकडेल भागातील जामा मशीदपासून रॅलीला सुरुवात होऊन शहरातील विविध भागातून काढण्यात आली.या रॅलीमध्ये मशिदींचादेखावा सादर करण्यात आला. रॅलीत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी सहभागी होऊन मोहम्मद पैगंबर साहेब यांचा जयजयकार केला. त्यांचा जन्मदिवस म्हणजे वाईट वृत्तीचा नाश करावा, स्वच्छता मोहीम राबवावी मुलींचे संगोपन करावे, शहर व देशामध्ये शांतता रहावी तसेच मोहम्मद पैगंबर साहेब यांचे विचार लोकांर्पयत पोहोचणे हा या रॅलीचा उद्देश होता.या वेळी एकमेकांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. शाही मशीदीचे मौलाना रजा मोकाना नोमान सैयद, कमराली ट्रस्टचे इकबाल हाजी रहिमउद्दीन, जि.प.चे माजी सदस्य अभिजित पाटील, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, नगरसेवक संदीप पाटील, संजय साठे, वसीम तेली, रियाज कुरेशी, इरफान पठाण, निहाल अन्सारी, प्रा.एल.एस. सैयद, नासीर बेलदार, सरफराज तेली, नगरसेवक डॉ. अझर पठाण, रमाशंकर माळी, साजिद खाटीक, सय्यद कमरअली, रफिक गॅरेजवाले आदी उपस्थित होते.अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, शहादा पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, म्हसावदचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, शहादा शहरातील पोलीस अधिकारी, सारंगखेडा-म्हसावद तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीसह होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.थंडपेय व फळांचे वाटपशहादा शहरातील वल्र्ड मेमन ऑर्गनायझर व मेमन युथ विंग सर्कल शहादा यांच्यावतीने जनता चौकात रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी थंडपेय व फळांचे जि.प.चे माजी सदस्य अभिजित पाटील, नगरसेवक संदीप पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी सिटी फेडरेशनचे अध्यक्ष अहमद इक्बाल ईसानी, युथ विंगचे अध्यक्ष फयाज मकसूद इसानी, साहील हासमानी, आर्वेश धनानी, राजू मेमन, वसीम जकरिया, अनिस इसानी, फारूक मेमन, हरून आसमानी, रऊफ इसानी, आरिफ हसमानी, रियाज शेखानी, आसिफ इसानी, इमरान मेमन, इम्रान इसानी व कार्यकत्र्यानी थंडपेय, आईसक्रीम, बिस्कीट व पिण्याच्या पाण्याचे वाटप केले.
ईद-ए-मिलादनिमित्त शहाद्यात मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:32 IST