शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

हिंगणी गावात प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 13:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील हिंगणी येथील ४९ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने त्याच्या परिवारातील व नातेवाईक ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : शहादा तालुक्यातील हिंगणी येथील ४९ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने त्याच्या परिवारातील व नातेवाईक अशा २८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी १५ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी १४ जणांचे अहवाल रविवारी रात्री निगेटीव्ह तर मयताच्या २९ वर्षीय पुतण्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली. सोमवारी पुन्हा २८ पैकी १४ जणांचे स्वॅब घेण्यात येतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे हिंगनी गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे.हिंगणी येथील कोरोनाने मृत झालेली व्यक्ती १५ मे रोजी मुंबईहून आपल्या मूळगावी हिंगणी येथे आला होता. तो तºहाडी व वरुळ, ता.शिरपूर येथे खाजगी डॉक्टरांकड़े तपासणी करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याचा पुतण्या २९ वर्षीय पॉझिटीव्ह रुग्णही सतत आठ दिवस त्याच्यासोबत होता. तसेच मृताच्या अंत्ययात्रेतही तो सामील झाला होता. मयत झालेली व्यक्ती मुंबईहून आल्यानंतर मित्र परिवारच्याही संपर्कात आलेली होती. तसेच जिल्ह्याबाहेर जाऊन खाजगी डॉक्टरांकड़े उपचार केले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून गावातील मित्रांना व दोन खाजगी डॉक्टर, एक लॅब टेक्नीशियन अशा सहा जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय मोहने यांच्या मार्गदशार्नाखाली आरोग्य विभागाचे चार पथक नियुक्त करुन गावात आरोग्य पथकामार्फत तपासणी सुरु करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फत गावात फवारणी व सॅनिटायझर वाटप करण्यात येऊन उपाययोजना करण्यात आली.प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय मोहने, सारंगखेड्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सरपंच सुनील पाटील, पोलीस पाटील वाल्मिक दाभाडे, ग्रामसेवक बी.डी. तिरमले, तलाठी एस.आर. साळवे हे परिस्थितीवर नियत्रंण ठेऊन आहेत. गाव पूर्ण लॉकडाऊन करण्यात येऊन पोलीस प्रशासनाकडून गावात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.