शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संस्था चालक संघ 2 नोव्हेंबरला शाळाबंद आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे 2 नोव्हेंबर रोजी एक दिवशीय शाळा बंद आंदोलन करण्यात येणार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे 2 नोव्हेंबर रोजी एक दिवशीय शाळा बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय संघाची बैठक शनिवारी पथराई येथील सैनिकी विद्यालयात झाली. मुख्याध्यापक संघानेही पाठींबा दिला आहे.बैठकीला राजेंद्रकुमार गावीत, मोतिलाल पाटील, मनोज रघुवंशी, प्रा.मकरंद पाटील, श्रीपत पाटील सुहास नटावदकर, अभिजीत पाटील, प्रा.एल.एस.सैय्यद, यशवंत पाटील, भास्कर पाटील आदी उपस्थित होते. श्रीपत पाटील, मोतीलाल पाटील, राजेंद्रकुमार गावीत यांनी मनोगत व्यक्त केले.  शिक्षण संस्था चालकांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून महामंडळाच्या अंतर्गत पाठपुरावा सुरू आहे. आंदोलनेही झाली, परंतु शासनाने मागण्यांबाबत काहीही हालचाल केली नाही. ही बाब लक्षात घेता आता पुन्हा एक दिवशीय शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. संस्था चालकांच्या मागण्यांमध्ये 20 टक्के अनुदानीत शिक्षकांना प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान द्यावे. अघोषीत शाळा वर्ग, तुकडय़ा व महाविद्यालयांना तात्काळ निधीसह घोषीत करावे. ऑक्टोबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही जुनीच पेन्शन योजना लागू करावी. सातवा वेतन आयोग लागू करावा. शिपाई भरती सुरू करावी. अनेक वर्षापासूनचा शिक्षकेतर आकृतीबंध जाहीर करावा. शिक्षण संस्थांना मालमत्ता कर व वीज बिलातून सुट मिळावी. यासह इतर समस्या सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने त्वरीत पाऊले उचलावीत व लक्ष वेधले जावे यासाठी 2 नोव्हेंबर रोजी राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे एक दिवशीय बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनानंतरही शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यास बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. मुख्याध्यापक संघाचे अधिवेशन पुढील महिन्यात होणार असून ते यशस्वी करण्यासाठी संस्था चालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांनी केले. सूत्रसंचलन डॉ.एन.डी.नांद्रे यांनी केले. आभार मुकेश पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी जयदेव पाटील, नरेंद्र पाटील, पुष्पेंद्र रघुवंशी, भिमसिंग वळवी यांनी परिश्रम घेतले.