शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांना तोंड देत विद्याथ्र्याचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 11:35 IST

गणोर शासकीय आश्रमशाळा : आदिवासी प्रकल्प विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील गणोर येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्याथ्र्याना विविध समस्यांना तोंड देत शिक्षण घ्यावे लागत असून संबंधित विभागाने या समस्या सोडविण्याची नितांत गरज आहे. विद्याथ्र्याच्या शौचालयांची दुरवस्था झाल्याने त्यांना रात्री-बेरात्री उघडय़ावर शौचासाठी जावे लागते तर झोपण्यासाठी          पलंग नसल्याने जमिनीवर झोपावे लागते. या प्रकारामुळे विद्याथ्र्याच्या जिवीताला धोका निर्माण झाला  आहे.गणोर येथील शासकीय आश्रमशाळेत पहिली ते दहावीर्पयत 417 विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेतात. त्यात 213 विद्यार्थी व 204 विद्यार्थिनी आहेत. या आश्रमशाळेतील समस्यांमध्ये सुधारणा होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. विद्याथ्र्यासाठी असलेल्या शौचालयांची           दुरवस्था झाली असून सेप्टीक टँकही खराब आहे. त्यामुळे 213 विद्याथ्र्याना जीव धोक्यात घालून रात्री-बेरात्री उघडय़ावर शौचासाठी जावे लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू व इतर विषारी सरपटणा:या प्राण्यांपासून धोका असतो. हा धोका पत्करून  विद्याथ्र्याना उघडय़ावर शौचासाठी जावे लागते.विद्यार्थी झोपतात जमिनीवरया आश्रमशाळेतील निवास व्यवस्थेचेही तीनतेरा वाजले आहेत. याचा विपरीत परिणाम विद्याथ्र्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर जाणवत आहे. आश्रमशाळेच्या नवीन इमारतीत वर्ग भरतात. परंतु निवास व्यवस्थेत कोणतीही सुधारणा झालेली नाही. विद्याथ्र्याना झोपण्यासाठी पलंग नसल्याने खोल्यांमध्ये जमिनीवर दाटीवाटीने खाली झोपावे लागते. कर्मचा:यांच्या निवासस्थानांचीही दुरवस्था झाली असून त्यांनाही जीव मुठीत धरून या निवासस्थानांमध्ये रहावे लागत आहे.आश्रमशाळेतील जनरेटर अनेक दिवसांपासून धूळखात पडलेले असून वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अंधार पसरतो. सोलर वॉटर हिटर नसल्याने विद्याथ्र्याना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. काही दिवसांनी हिवाळा सुरू होईल तेव्हाही विद्याथ्र्याना थंड पाण्यानेच आंघोळ करण्याची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.गणोर आश्रमशाळेतील दुरवस्थेबाबत तेथील कर्मचा:यांना विचारणा केली असता विद्याथ्र्याना झोपण्यासाठी पलंग, शौचालयांची दुरुस्ती, कर्मचा:यांची रिक्त पदे व इतर समस्यांबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. प्रशासनाकडून मंजुरी आल्यावरच या समस्या दूर होतील, असे सांगितले. त्यामुळे या दुरवस्थेला नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.