शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभाग एसआयटीलाही जुमानेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 13:11 IST

बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरण : 31 रोजी माहिती सादर करण्याची शेवटची मुदत

नंदुरबार : अपंग युनिटअंतर्गत भरती झालेल्या बोगस शिक्षक व परिचरांच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीला संबधीत जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागातील अधिकारी थारा देत नसल्याची बाब समोर आली आहे. आता एसआयटीने सर्व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्वाणीचे पत्र दिले असून 31 ऑक्टोबर रोजी पुणे येथे सर्व माहितीसह जबाबदार अधिकारी पाठविण्याच्या सुचना दिल्या आहेत. नंदुरबारसह राज्यातील जवळपास 23 जिल्हा परिषद आणि महापालिकेत अपंग युनिटअंतर्गत मोठय़ा प्रमाणावर बोगस शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले गेले होते. राज्यात ही संख्या 400 ते 500 च्या घरात आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेत संशयीत 71 शिक्षक असून 31 जणांवर फौजदारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेतील ही बाब ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर राज्यभर तिचे पडसाद उमटून सर्वच जिल्हा परिषदांमध्ये चौकशी सुरू झाली होती. विधी मंडळाच्या अधिवेशनात विधान सभेत आमदार एकनाथ खडसे आणि विधानपरिषदेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी लक्षवेधी मांडून हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तातडीने एसआयटीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात 21 मे 2018 रोजी एसआयटी स्थापन करण्यात आली. विशेष चौकशी पथकाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची नियुक्ती करण्यात आली. सोळंकी यांनी चौकशी समितीचा पदभार स्विकारल्यानंतर लागलीच नंदुरबारसह जळगाव, धुळे, पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधूदूर्ग, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, गडचिरोली, वर्धा, गोंदीया, अमरावती, अकोला, वाशिम व यवतमाळ या जिल्हा परिषदांना पत्र पाठवून विहित नमुन्यात या संदर्भातील सर्व माहिती मागविली होती. परंतु अनेक जिल्हा परिषदांनी ती माहितीच पुरविली नाही. शासनाने या चौकशी  समितीला 60 दिवसात अहवाल  सादर   करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ती मुदत 22 जून 2018 रोजीच संपली होती. त्यानंतर चौकशी समितीने  सर्वच जिल्हा परिषद शिक्षणाधिका:यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेळोवेळी स्मरण देखील करून दिले. परंतु कुणीही त्यांना दाद दिली नाही. आता स्वत: समिती अध्यक्षांनीच संबधीत सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्वाणीचे पत्र दिले आहे. 31 ऑक्टोबर रोजी मागविण्यात आलेली सर्व माहिती आवश्यक त्या पुराव्यानिशी वेळेत पुणे येथे सादर करावी. त्यासाठी खास अधिकारी नेमून त्यांना पाठविण्यात येण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. याबाबत नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी देखील नाशिक विभागातील सर्व जिल्हा परिषदांना याबाबतचे पत्र दिले आहे. यामुळे आता अपंग युनिटअंतर्गत बोगस शिक्षक व परिचर भरतीचा   मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता     आहे.