शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत-२७ वर्षांपासून घेतल्या जाताय भुकंपाच्या नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 13:21 IST

सावळदा भुकंप मापन केंद्रात आधुनिक उपकरणे सरदार सरोवर निगमचे सावळदा येथील भुकंप मापक केंद्र परिसराच्या दृष्टीने महत्वाचे आहे. शनिवारी बसलेल्या धक्क्याची माहिती लागलीच उपलब्ध होऊ शकली. -दिलीप जाधव.

मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कसावळदा येथील भुकंप मापक केंद्रात अत्याधुनिक सिस्मोग्राफ यंत्राद्वारे भुकंपाची नोंद घेतली जाते. १९९३ साली सरदार सरोवर निगम अंतर्गत स्थापन झालेल्या या केंद्राला थेट गांधीनगर येथील केंद्राला जोडण्यात आले असून तेथून ॲानलाईन डाटा वेबसाईटवर पहाण्यास मिळतो. येथील केंद्रामुळे परिसरातील भुकंपाच्या नोंदी लागलीच आणि अचुक मिळण्यास मदत होत असल्याची माहिती या केंद्राचे प्रमुख दिलीप जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

सावळदा केंद्राची स्थापना कधी झाली आणि त्याचे कार्य काय?सरदार सरोवर प्रकल्पाअंतर्गत १९९३ साली सावळदा येथे भुकंप मापन केंद्र स्थापन करण्यात आले. भौगोलिक संशोधन आणि मापन या पद्धतीनुसार तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार हे केंद्र सावळदा येथे स्थापन करण्यात आले. पूर्वी या केंद्रात भूकंप नोंदणीचे जुने उपकरणे होते. नंतर त्यात अत्याधुनिक यंत्र बसविण्यात आले. हे केंद्र सरदार सरोवर निगम अंतर्गत येते. सरदार सरोवर निगमअंतर्गत गांधीनगर येथील मुख्य केंद्राशी या केंद्राची लिंकींग आहे. या केंद्रात पूर्वी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त होती. परंतु आता ॲानलाईनमुळे येथील काही कर्मचारी गांधीनगर येथे वर्ग करण्यात आले असून आता येथे चार कर्मचारी कार्यरत आहेत.सिस्मोग्राफ उपकरणाचे कार्य काय असते?भुकंपाची तीव्रता आणि वेळ याची माहिती नोंद करण्यासाठी या उपकणारचा वापर आता केला जातो. पूर्वी जुन्या पद्धतीने या ठिकाणी भुकंपाची तीव्रता आणि वेळ व स्थान यांची नोंदणी केली जात होती. जमिनीत होणारऱ्या हालचालींची नोंद हे यंत्र घेते. त्यानुसार ग्राफ तयार करून ते उपलब्ध करून देते. त्यामुळे भुकंपाचे केंद्र आणि त्याची तीव्रता लागलीच लक्षात येऊन प्रशासनाला माहिती दिली जाते. याशिवाय गांधीनगर येथील केंद्रातून ॲानलाईन डाटा सर्वत्र उपलब्ध होत असतो. त्यामुळे प्रशासनाला उपाययोजना  करणे व जनतेला आवाहन करणे सोयीचे ठरते. 

एकुण नऊ केंद्र... सरदार सरोवर निगम अंतर्गत एकुण नऊ भुकंपमापन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्रात एकमेव सावळदा केंद्र आहे. गुजरातमध्ये पाच तर मध्यप्रदेशात तीन केंद्र आहेत. ही सर्व केंद्र गांधीनगर येथील मुख्य केंद्राशी जोडण्यात आले असून ते ॲानलाईन डाटा तयार करते.अनेक नोंदी... भुकंपाच्या अनेक नोंदी या ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत. बारीकसारीक नोंदी देखील होत असतात. परंतु त्याची जाणीव आपल्याला होत नाहीत. दोन किंवा अडीच पेक्षा अधीक रिक्टर स्केलच्या तीव्रवतेचे धक्केच जाणवत असतात. शनिवारी आलेले धक्के हे अडीचपेक्षा अधीक असल्याने ते जाणवले. ७०० कि.मी.ची नोंद... या केंद्राअंतर्गत ७०० ते ८०० कि.मी.मधील भुकंपाची नोंद घेतली जाते. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील भुकंपांचाही तीव्रता या ठिकाणी नोंदली गेली होती. अर्थात गांधीनगर केंद्र हे मध्यवर्ती असल्याने तेथेच सर्व डाटा तयार होतो.