लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गणपती बाप्पा मोरया अन् पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत भक्तांनी लाडक्या बाप्पाला जल्लोषा निरोप दिला़ जिल्ह्यात तब्बल 139 सार्वजनिक आणि 40 खाजगी गणेश मंडळांसह इतर मंडळांनी गुरुवारी विसजर्न केल़े गुरुवारी सकाळी 11 वाजेपासून सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणूका सुरु झाल्या होत्या़ यात नंदुरबारातील मानाचे श्रीमंत दादा आणि बाबा, काका, मामा, तात्या, भाऊ गणपती मंडळांचा समावेश होता़ सवाद्य काढलेल्या या मिरवणूकीत पारंपरिक गोफ नृत्यासह लेङिाम नृत्य करणारे असंख्य युवक लक्ष वेधून घेत होत़े युवकांसोबत आबालवृद्ध आणि महिलांनी आपआपल्या मंडळाच्या मिरवूणकीत उत्स्फूर्त सहभाग दिला़ जळका बाजार, शिवाजी रोड, टिळक रोड, गणपती मंदिर रोड, जुनी नगरपालिका चौक, शास्त्री मार्केट, स्टेशनरोड व नेहरु चौक मार्गाने शहरातील विविध भागातील गणेश मंडळे वाजत-गाजत विसजर्न मिरवणूकीत दाखल झाले होत़े मानाच्या गणपतींचे मोठा मारुती मंदिराजवळील सोनी विहिरीत रात्री उशिरा विसजर्न करण्यात आले तर उर्वरित गणेश मंडळे प्रकाशा ता़ शहादा येथील तापी पात्राकडे रवाना झाले होत़े नंदुरबार शहरात मुख्य मिरवणूक मार्गावरून 27 सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणूका निघाल्या होत्या़ मिरवणूकांच्या पाश्र्वभूमीवर सकाळी 9 वाजेपासून शहरातील वाहतूक वळवण्यात आली होती़ मंगळबाजार, घी बाजार, गणपती मंदीर, सोनारखुंट, सराफ बाजार, टिळकरोड, जळकाबाजार, कमानी दरवाजा, दोशाहतकिया, दादा गणपती, देसाई पेट्रोलपंपमार्गे विसजर्न मिरवणूका मार्गस्थ होत होत्या़ मार्गाकडे जाणारे सर्वच रस्ते पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आले होत़े पोलीस कर्मचा:यांनी बुधवारी रात्रीच 25 ठिकाणी बॅरिकेटींग करुन घेत रस्ते बंद केले होत़ेयातून नवापूर, साक्रीकडून शहरात येणारी वाहने वाघेश्वरीे चौफुलीमार्गे वळविण्यात आली होती़ हाटदरवाजा परिसरातून धानोराकडे जाणा:या बसेसही वळवण्यात आल्या होत्या़गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर एक पोलीस अधीक्षक, एक अपर अधीक्षक, पाच उपअधीक्षक, 16 पोलीस निरिक्षक, 54 सहायक व उपनिरिक्षक, 718 पोलीस कर्मचारी, 140 महिला पोलीस कर्मचारी, 632 पुरुष व महिला होमगार्ड, एसआरपीएफची एक कंपनी, सात क्रॅश प्लाटून, दोन आरसीपी व एक क्यूआरटीची टीम असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ शुक्रवारी दुपार्पयत पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड बंदोबस्तावर थांबून होत़े नंदुरबार शहरात रात्री दादा बाबा गणपतीची हरीहर भेट रात्री 10 वाजेच्या सुमारास पूर्ण झाल्यानंतर दादा व त्यामागे बाबा गणपती व इतर मानाचे मंडळे होती़ त्यांच्या मागे रोकडेश्वर हनुमान, भोई समाज मंडळ, वीरशैव लिंगायत मंडळ, पवनपूत्र मंडळ, राणा राजपूत समाज मंडळ, सिद्धी विनायक मंडळ, सावता फुले मंडळ, स्वामी विवेकानंद, मारुती व्यायाम शाळा, जोशी-गोंधळी समाज, जय दत्त व्यायाम शाळा, नवयुवक, वीर छत्रपती शिवाजी, भगवा मारुती, विजयानंद, महाराणा प्रताप, संताजी जगनाडे, शक्तीसागर यासह इतर मंडळांचा समावेश होता़ यातील मानाच्या मंडळांचे सोनीविहिरीत पारंपरिक पद्धतीने विसजर्न करण्यात आल़े उर्वरित गणेश मंडळे प्रकाशाकडे रवाना झाले होत़े
पुढच्या वर्षी लवकर या चे साकडे घालत बाप्पांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:04 IST