शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिका इमारतीचे ई भुमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:25 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  पालिकेच्या अद्ययावत इमारतीचे भुमिपूजन, स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पालिकेच्या अद्ययावत इमारतीचे भुमिपूजन, स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी दुपारी १ वाजता ॲानलाईन पद्धतीने करणार आहे. त्याचा लाईव्ह सोहळा नाट्यमंदीरात निमंत्रीतांच्या उपस्थितीत होणार असून मुख्यमंत्री ठाकरे संबोधीत करणार असल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. रघुवंशी यांनी सांगितले, या दोन्ही कामांचे भुमिपूजन तसेच उद्‌घाटन आठ महिन्यांपूर्वी करण्यात येणार होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दौराही निश्चित झाला होता. परंतु परिवारात दु:खद घटना घडल्याने तो कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव, लॅाकडाऊन यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा होऊ शकला नाही.त्यामुळे हा सोहळा ॲानलाईन पद्धतीने करण्याचे नियोजन     करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला मान्यता दिली. त्यामुळे     रविवार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता मा अद्ययावत इमारतीचे भुमिपूजन, स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे उद्‌घाटन   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यानंतर ते जनतेला संबोधीत करणार आहेत. या सर्व सोहळ्याचे प्रेक्षेपण नाट्यगृहात लावण्यात येणा-या एलईडीवर करण्यात येणार आहे. केवळ निमंत्रीतांसाठी हा सोहळा राहणार आहे. पालिकेची इमारत न्यायालयाच्या जुन्या जागेवर बांधण्यात येणार      आहे. त्यासाठी एकुण २३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दोन वर्षात ही इमारत बांधून पुर्ण होणार आहे. जलतरण तलाव देखील         ॲालम्पीक स्पर्धांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. त्याला स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. 

मॅा-बेटी गार्डनला मिनाताई ठाकरे नावn पालिकेतरर्फे एक कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या मॅा-बेटी गार्डनला मॅासाहेब स्व.मिनाताई ठाकरे मॅा-बेटी गार्डन असे नाव देण्याचे निश्चित झाले असल्याचे चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. या गार्डनमध्ये केवळ महिला आणि मुलींनाच प्रवेश दिला जाणार आहे. तरुणींना प्रेरणादायी ठरणाऱ्या दहा कर्तूत्ववान महिलांचे शिल्प देखील बसविण्यात येणार असून लवकरच त्याचेही उद्घाटन करण्यात येणार असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.