शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

बनावट मद्याच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुनी वाण्याविहिर ता़ अक्कलकुवा येथील घरात सुरु असलेला बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जुनी वाण्याविहिर ता़ अक्कलकुवा येथील घरात सुरु असलेला बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस दल यांच्या संयुक्त कारवाईत उध्वस्त करण्यात आला़ पथकाने येथून सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आह़ेनिवडणूक आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर अवैध मद्याची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस दलाने मोहिम सुरु केली आह़े यांतर्गत जुनी वाण्याविहिर येथे एका घरात बनावट मद्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती़ बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उत्पादन शुल्कचे निरीक्षक संजय पाटील, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्यासह पथकाने जुनी वाण्याविहिर गावातील घरावर छापा टाकला़ यावेळी घरात रिकाम्या बाटल्यांमध्ये दारु भरण्याचे काम सुरु असल्याचे पथकाला दिसून आल़े  कारवाईनंतर परिसरात उपस्थित असलेल्यांची धावपळ सुरु झाली़  याठिकाणी 1 हजार 680 बनावट व्हिस्कीच्या बाटल्या, विदेशी मद्याचा तयार 200 लीटर बनावट ब्लेंड, बुच, रिकाम्या बाटल्या, पुठ्ठय़ाचे खोके आणि मद्य तयार करताना तिव्रता मोजण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 3 लाख 84 हजार 746 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला़ हा मुद्देमाल ताब्यात घेत याठिकाणी उपस्थित असलेल्या घरमालक महिलेस पोलीसांनी अटक केली़ कारखाना चालवणारा मुख्य सूत्रधार फरार झाल्याने पोलीसांकडून त्याचा शोध घेतला जात आह़े  ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे, उपविभागीय आयुक्त अजरुन ओहोळ, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक परदेशी, पोलीस निरीक्षक डांगे, सहायक पोलीस निरीक्षक डी़डी़पाटील, दुय्यम निरीक्षक शैलेंद्र मराठे, जी़जी़अहिरराव, पोलीस कॉन्स्टेबल भूषण चौधरी, रामसिंग राजपूत, मानसिंग वळवी, संदीप वाघ, हितेश जेठे, राजेंद्र पावरा, राम वळवी, कन्हैय्या परदेशी, असमसिंग पाडवी, संगीता नाईक, ममता पाडवी यांनी केली़ 

पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केलेला कारखाना रविंद्र भामटय़ा पाडवी रा़ जुनी वाण्याविहिर हा चालवत असल्याची माहिती देण्यात आली आह़े पथकाच्या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर तो घटनास्थळावरुन फरार झाला होता़ त्याची पत्नी आहलूबाई हिला पथकाने ताब्यात घेतल़े तिला दुपारी तळोदा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आह़े न्यायालयाच्या आदेशानंतर आहलूबाई हिची धुळे येथील कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े बनावट मद्याचा कारखाना नेमका कधीपासून सुरु होता यासह विविध प्रश्नांची उत्तरे मुख्य सूत्रधार रविंद्र पाडवी हा हाती आल्यानंतर पोलीसांना मिळणार आहेत़