शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईमुळे विहिरींचे खोलीकरण करुनही पाणी लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 18:38 IST

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील घुली-कोळदेसह लगतच्या परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून विहिरींचे खोलीकरण करण्यात ...

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील घुली-कोळदेसह लगतच्या परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून विहिरींचे खोलीकरण करण्यात येत आहे़ दोन दिवसात पाण्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यातचा इशारा कोळदे येथील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे़नंदुरबार तालुक्यातील कोळदेसह खोडसगाव, वरुळ, पळाशी, समशेरपूर, पथराई आदी गावांमध्ये भयंकर पाणीटंचाईची समस्या निर्माण झालेली आहे़ वाढत्या बाष्पीभवनामुळे आहे, तेवढेही पाणी संपत असल्याने येथील पिक जगवणे ग्रामस्थांना कठीण जात आहेत़ तीव्र पाणीटंचाई असल्याने कोळदे येथील ग्रामस्थांनी दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे़ याबाबत बुधवारी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यात येणार आहे़ तसेच दोन दिवसात प्रशासनाने पाणी टंचाई निवारणासाठी योग्य भुमिका न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कोळदा येथील उपसरपंच सुभाष राजपूत यांनी दिला आहे़दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील घुली-कोळदे येथे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने शेतकºयांना रब्बी हंगामापासून वंचित रहावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे़ पपई पिक वाचविण्यासाठी घुली ता़ नंदुरबार येथील शेतकºयांकडून विहिरी खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे़ खोलीकरण करुनही विहिरींना पाणी लागत नसल्याने शेतकºयांचा खोलीकरणावरील खर्चही वाया जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे़ घुली, पळाशी, कोळदे शिवारातील लहान मोठे गावतलाव, बंधारे पाण्याअभावी भरलेच नाहीत़ परिणामी पाण्याची पातळी खालावली असल्याने अनेक शेतकºयांना फटका बसत आहे़ विहिरींनी तळ गाठला असून पाण्यासाठी शेतकºयांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे़ पाण्यासह पशुपालकांना चारा टंचाईची समस्याही सहन करावी लागत आहे़