लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.सविस्तर वृत्त असे की, सध्या कोळदा ते खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ब्राrाणपुरी येथे रस्ता खोलीकरणासाठी पोकलेन मशीनद्वारे खोलीकरण करण्यात येत आहे. रात्रीच्या सुमारास ट्रकचे चाक फसल्याने पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्ता रुंदीकरण कामावरील कर्मचारी व ग्रामस्थांनी वाहतूक सुरळीत केली.ग्रामस्थ बनले वाहतूक पोलीससध्या ब्राrाणपुरी गावात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरून ये-जा करणा:या अवजड वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वत: ग्रामस्थ वाहतूक पोलिसांची जबाबदारी पार पाडताना दिसून येतात.
जलवाहिनी फुटल्याने वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 12:12 IST