शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

महिलेच्या सतर्कतेमुळे चोरटे गारद

By admin | Updated: January 25, 2017 00:18 IST

धाडस : जिल्ह्याच्या विविध भागात चोरी केल्याची कबुली

नंदुरबार : दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने चोरी करण्याच्या इराद्याने घरात घुसलेल्या दोघांना महिलेने कुलूपबंद करत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना तळोदा शहरात घडली़ महिलेच्या धाडसाचे तळोदा शहरातून कौतुक करण्यात येत आह़े दरम्यान ताब्यात घेतलेले दोघा परप्रांतीय चोरटय़ांनी शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे दागिने लांबवल्याची कबुली दिली आह़े सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तळोदा येथील दामोदर नगरात राहणा:या ताराबाई बन्सीलाल पवार (40) यांच्या घरी दोघे बिहारी दागिने पॉलिश  करून देतो असे सांगून आल़े या दोघांवर काहीकाळ विश्वास ठेवत त्यांनी दोघांना घरात प्रवेश दिला़ यावेळी दोघांनी ताराबाई यांच्याकडील पैंजण उजळूनही दाखवल़े यामुळे विश्वास बळावलेल्या ताराबाई यांनी सोन्याचे दागिने उजळून देण्याचे निश्चित केल़े त्यासाठी त्यांनी 80 हजार रुपये किमतीच्या बांगडय़ा चोरटय़ांच्या हातात दिल्या़ दोघांनी त्या बांगडय़ा घेत कुकरमधील पाण्यात टाकून पाणी गरम करून आणण्यास सांगितल़े यावेळी मात्र ताराबाई यांना शंका आल्याने त्यांनी कुकर तपासला, त्यात बांगडय़ा दिसून आल्याने त्यांनी घरातच असलेल्या दोघांची कॉलर पकडून बसवले व हिमतीने बाहेर जात दरवाजा बाहेरून बंद केला़ त्यांनी ही बाब जवळपासच्या लोकांना कळवल्याने त्यांनी घटनास्थळी येऊन माहिती जाणून घेतली़ पोलिसांना नागरिकांनी खबर दिल्यानंतर त्यांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतल़े याबाबत ताराबाई पवार यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघा चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहादा येथील ओमशांती नगरात सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास किरण नितीश महाले यांच्या घरी एकाने भेट देत दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत प्रवेश केला़ किरण महाले यांनी संबंधितावर विश्वास ठेवत त्याला आठ हजार रुपयांचे सोन्याचे मणी व 10 हजार रुपयांचे इतर सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले होत़े दागिने पॉलिश केल्याचा भास निर्माण करत, चोरटा काही वेळाने घराबाहेर पडला़ किरण महाले यांनी दागिने तपासल्यावर ते मिळून आले नाही़ फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना ही बाब सांगितली व पोलिसात गुन्हा दाखल केला़ किरण महाले यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े4तळोदा येथून ताब्यात घेण्यात आलेले दोघे बिहार राज्यातील आहेत़ सत्येंद्र कुमार रघुनाथ भगत (रा़ ह्रदयनगर जि़ पूर्णिया) व सुजितकुमार सुनीलप्रसाद शहा (रा़ भागलपूर) अशी या दोघांची नावे आहेत़ दोघांनी तळोदा तालुका किंवा या आरोपींची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती तळोदा पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आह़े