शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यात दोन वर्षात राबवलेल्या वृक्ष लागवड मोहिमेमुळे बहरले वनक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:30 IST

पर्यावरण : प्रतापपूर परिसरात शेकडो झाडे सुस्थितीत

नवापुर : राज्यशासनाने गेल्या सलग तीन वर्षात केलेल्या वृक्षलागवडींतर्गत नवापूर तालुक्यात दोन लाख रोपांनी तग धरत वनक्षेत्र समृद्ध सहाय्य केले आहे़ लागवड केलेल्या वृक्षांपैकी ९० टक्के वृक्ष हे चांगल्या प्रकारे टिकून असल्याने वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट्य साध्य झाल्याचे सांगण्यात येत आहे़जागतिक तापमान वाढ, हवामान व रुतु बदलाची दाहकता व तीव्रता कमी करण्यासाठी राज्यात वृक्षारोपणाची प्रभावी मोहिम हाती घेण्यात आली आहे़ २०१६ च्या पावसाळ्यात जिल्ह्यात १२ लाख ८३ हजार रोपे लावण्याचे उद्दीष्ट होते. १२ लाख ९१ हजार रोपे लावून उद्दीष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण जिल्ह्यात झाले. वन विभागाने सर्वाधिक १० लाख ३३ हजार रोपांची लागवड केली होती़ २०१७ मध्येही २४ लाख वृक्ष लागवड तर २०१८ मध्ये ५१ लाख वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला होता़ यातून नंदुरबार वनविभागाने नवापूर तालुक्यात लागवड केलेल्या वृक्षांची स्थिती अत्यंत मजबूत झाली आहे़ तालुक्यातील प्रतापपूर, चिंचपाडा, बिलमांजरे आणि लक्कडकोट या वनक्षेत्रातील रोपे जिवंत राहण्याचे प्रमाण हे ९५ टक्के आहे़तालुक्यातील प्रतापपूर वन क्षेत्रात २०१६ मध्ये ५० हजार रोपांची लागवड करण्यात आली. महु, निंब, शिवण, आवळा, बोर, चिच, बेहेड, साग व सीताफळ या रोपांचा त्यात समावेश होता. त्यात केवळ सात टक्के रोपांना मर आला होता़ उर्वरित ३७ हजार रोपे आज चांगल्या प्रकारे वाढली आहेत़ चिंचपाडा वनक्षेत्रातील खोकसा येथे १० हेक्टर क्षेत्रात लावण्यात आलेली सागाची झाडे ही ९९ टक्के शाबूत आहेत़ बिलमांजरे व लक्कडकोट येथील वन क्षेत्रातही लावण्यात लावलेली रोपे ९५ टक्के सुस्थितीत आहेत़ २०१७ आणि २०१८ या वर्षात लावलेली झाडेही येथे चांगल्या स्थितीत आहेत़ जिल्ह्यात २०१८ मध्ये नंदुरबार वनविभागाने १९ लाख १० हजार, तळोदा वनविभाग १६ लाख ९६ हजार, सामाजिक वनीकरण विभाग ४ लाख तर इतर विभाग दोन लाख ५० हजार, ग्रामपंचायत सहा लाख ४५ हजार तर अशासकीय संस्थााकडून दोन लाख ६५ हजार रोपांची लागवड करण्यात आली होती़ जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात या झाडांचे जगण्याचे प्रमाण ९० टक्के आहे़ उर्वरित ठिकाणी पाण्याअभावी झाडे वाढू शकलेली नाहीत़