शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात बंदमुळे भाजीपाला खरेदी-विक्री झाली ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 20:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शुक्रवारी भाजीपाला व्यापा:यांनी कडकडीत बंद पाळला. सकाळी व सायंकाळी बाजार समितीत भाजीपाल्याचा लिलावही होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शुक्रवारी भाजीपाला व्यापा:यांनी कडकडीत बंद पाळला. सकाळी व सायंकाळी बाजार समितीत भाजीपाल्याचा लिलावही होऊ शकला नाही. बाजारात देखील भाजीपाला व्यापारी दिसून आले नाहीत. यामुळे लाखो रुपयांची उलाढाला ठप्प झाली होती. यामुळे गृहिणींची अडचण झाली तर मोठय़ा हॉटेल व्यावसायिकांनाही समस्येला सामोरे जावे लागले.दि. नंदुरबार व्हेजीटेबल कमिशन एजंट असोसिशएन, महात्मा फुले भाजीपाला मार्केट यार्डचे माजी अध्यक्ष व माळी समाजाचे अध्यक्ष नगरसेवक आनंद माळी यांच्यावरील झालेल्या जिवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ व्हेजीटेबल असोसिएशनसह इतर संघटनांतर्फे शुक्रवारी बंदचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच असोसिएशनतर्फे बाजार समिती सभापतींना बंदबाबत निवेदन देण्यात आले होते. बाजार समितीत दोन वेळा लिलाव होतात. शुक्रवारी दोन्ही  वेळचे लिलाव होऊ शकले नाहीत. बाजार समितीच्या भाजीपाला यार्डमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. एकही वाहन भाजीपाला घेवून आले नाही किंवा बाहेर गेले नाही. यामुळे बाजार समितीचे लाखोंचे नुकसान झाले. मंगळ बाजार आणि इतर ठिकाणी भरणारा भाजीपाला बाजार देखील दिवसभर बंद होता. यामुळे मंगळ बाजारात देखील शुकशुकाट दिसून आला. अनेक जणांना सकाळी बंदची माहिती नसल्यामुळे त्यांना आल्या पावली परत जावे लागले. नेहमीच गजबजलेला मंगळ बाजारातील शुकशुकाट दिवसभर कायम होता.सकाळी बाहेरगावहून येणा:या किरकोळ भाजीपाला विक्रेत्या महिलांनाही बंदची कल्पना आल्यानंतर परत जावे लागले.गृहिणींची अडचणभाजीपाल मार्केट संपुर्णपणे बंद असल्यामुळे गृहिणींना अडचणींचा सामना करावा लागला. सकाळी अनेक गृहिणी बाजारात     नेहमीप्रमाणे भाजीपाला खरेदीसाठी आल्या. परंतु बंदची कल्पना आल्यानंतर त्यांना माघारी फिरावे लागले. हॉटेल व्यावसायिकांची अडचणया बंदमुळे हॉटेल व्यावसायिकांनाही मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागले. शाकाहारी हॉटेलमध्ये भाजीपाला मोठय़ा प्रमाणावर खरेदी केला जातो. त्यापासून विविध डिश तयार केल्या जातात. परंतु आजच्या बंदमुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांना साध्या आणि कायमच्या डिश ग्राहकांना द्याव्या लागल्या. परिणामी हॉटेल व्यवसायावरही मोठा परिणाम दिसून आला. दरम्यान, बंद यशस्वी झाल्याचा दावा दि.नंदुरबार व्हेजीटेबल कमिशन एजन्ट असोसिएशनतर्फे करण्यात आला. या बंदमध्ये कमिशन एजंट, व्यापारी, शेतकरी, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट मंगळ बाजार, पंडित नेहरू हातलॉरी संघटना नेहरु पुतळा यांनी पाठींबा देवून बंदला सहकार्य केल्याचे असोसिएशनतर्फे अध्यक्ष विजय माळी, उपाध्यक्ष रावसाहेब माळी, सचिव नरेंद्र माळी, कार्याध्यक्ष प्रवीण माळी यांच्यातर्फे सांगण्यात आले.