शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जाचक अटींमुळे नंदुरबारातील घरकुले पडली ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:44 IST

घरकूलची स्थिती : 876 घरे उपलब्ध, अर्ज केवळ 798, महिनाभरात वाटप होणार

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : पालिकेने घरकूल योजनेंतर्गत बांधकाम केलेल्या 876 घरांसाठी केवळ 798 अर्ज आल्याने पालिकेला ‘कुणी घर घेता का घर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. तीन ते चार वेळा अर्ज सादर करण्याची मुदत देऊनही अपेक्षित अर्ज आले नसल्याची स्थिती आहे. गृह निर्माण विभागाच्या जाचक अटींमुळेच घरकूल घेण्यास कुणी धजावत नसल्याची स्थिती आहे. शहरात बेघरांसाठी घरकूल योजना पालिकेने राबविली आहे. या योजनेतील घरे बांधून पूर्णदेखील झाली आहेत. आठ वर्षापूर्वी पालिकेच्या प्रस्तावानुसार एकूण 1176 घरकूल बांधकामाचे प्रस्तावित होते. त्यासाठी भोणे फाटय़ाजवळील जागा आणि जिल्हा रुग्णालयासमोरील जागा निश्चित करण्यात आली. परंतु प्रतिसाद पाहता केवळ 876 घरकुलांच्या निर्मितीचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने तेवढय़ा घरकुलांना मंजुरी दिली होती. पाच वर्षापासून दोन्ही ठिकाणी चार मजली अपार्टमेंटच्या स्वरूपात प्रत्येकी वन रूम किचनची घरकुले तयार करण्यात आली आहेत. त्यांचे बांधकाम पूर्ण झाले असतानाच आठ महिन्यांपूर्वी अचानक काही कुटुंबांनी घरकुलांचा ताबा घेतला. त्यानंतर पोलिसांकडून व पालिका प्रशासनाकडून घरे खाली करण्यात आली होती.अर्ज करण्याची मुदतघरकुलांसाठी वेळोवेळी अर्ज मागविण्यात आले. परंतु यादीच तयार होत नव्हती. अखेर 25 एप्रिलर्पयत शेवटची मुदत देण्यात आली होती. त्यातही केवळ 798 अर्ज सादर करण्यात आले. घरकूल 876 आहेत. त्यानंतरही 10 मे र्पयत पुन्हा मुदत देण्यात आली. तेंव्हाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जवळपास 70 पेक्षा अधीक घरकुले ही रिकामी पडतील. जर घरकुलांच्या संख्येपेक्षा अधिक अर्ज आले असते तर लकी ड्रॉ पद्धतीने घरकुलांचे वाटप करावे लागले असते. परंतु स्थिती त्यापेक्षा वेगळी आहे.यादी सादरजिल्हाधिका:यांकडे पालिकेने घरकूल लाभार्थ्ीची यादी सादर केली आहे. जिल्हास्तरीय समितीकडे यादी गेल्यावर तिची पडताळणी केली जाईल. त्यानंतर पात्र लाभार्थ्ीची निवड करून त्यांना घरकूल देण्यासंदर्भात पालिकेला शिफारस केली जाईल. त्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.बेघर संघर्ष समितीचा पाठपुरावाघरकुलांचे लाभार्थी निवडीचा वाद सुटलेला नाही. आधी बेघर संघर्ष समिती व नंतर त्याच पदाधिका:यांचे समाजवादी पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. त्यांच्या मागणीनुसार आपण दिलेल्या यादीनुसारच लाभार्थी निवडण्यात यावे. परंतु शासनाच्या नियमानुसारच लाभार्थी निवड करण्यात येईल, असा पवित्रा पालिकेने घेतला आहे. लाभार्थी निवडीच्या याद्या जाहीर होत नाही त्यामुळे तीन आठवडय़ांपूर्वी शेकडो कुटुंबीयांनी थेट घरकुलांचा ताबा घेतला होता. तो सोडल्यानंतर पुन्हा वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहेत. गेल्या महिन्यातदेखील बेघर संघर्ष समिती व समाजवादी पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले होते.