शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवावर यंदा दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:21 IST

नंदुरबार : नवरात्रोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आल्याने तयारीला वेग आला आहे. नंदुरबारातील काही मोजक्या मूर्तीकारांकडे देवीच्या मूर्ती तयार झाल्या असून नंदुरबारसह लगतच्या गुजरातमधील मोठी मंडळे देवीच्या मूर्ती घेवून जात आहेत. दरम्यान, यंदा नवरात्रोत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. नवरात्रोत्सवात तरी परतीच्या पावसाने कृपा करावी असे साकडे घातले जात आहे.यंदाच्या नवरात्रोत्सवावर दुष्काळाचे सावट ...

नंदुरबार : नवरात्रोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आल्याने तयारीला वेग आला आहे. नंदुरबारातील काही मोजक्या मूर्तीकारांकडे देवीच्या मूर्ती तयार झाल्या असून नंदुरबारसह लगतच्या गुजरातमधील मोठी मंडळे देवीच्या मूर्ती घेवून जात आहेत. दरम्यान, यंदा नवरात्रोत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. नवरात्रोत्सवात तरी परतीच्या पावसाने कृपा करावी असे साकडे घातले जात आहे.यंदाच्या नवरात्रोत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे आठ दिवसांवर हा उत्सव येवून ठेपला असला तरी पाहिजे तसा उत्साह अद्याप दिसून येत नसल्याची स्थिती आहे. असे असले तरी व्यावसायिकांनी तयारी सुरू केली आहे. नंदुरबारात गणेश मूर्ती कारागिरांपैकी काही कारागिर देवीच्या मूर्ती देखील तयार करतात. गणेशोत्सवानंतर लागलीच या मूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात होते. सध्या या मूर्ती तयार झाल्या असून मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती आता घेवून जावू लागले आहेत.यात्रेची तयारी पुर्णनंदुरबारात खोडाईदेवी यात्रोत्सव नवरात्रीच्या नऊ दिवसात असतो. त्यासाठी यशवंत विद्यालयाच्या मैदानावर व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली जात असते. यात्रेसाठी आतापासूनच व्यावसायिक दाखल होऊ लागले आहे. येथे संसारोपयोगी साहित्यासह खाण्याच्या पदार्थाचे दुकाने, मनोरंजनाची साधणे, पालख्या आदी येत असतात. त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. वाहतूक वळविणारडीआर हायस्कूल ते खोडाईमाता रस्त्यावरील वाहतूक नवरात्रोत्सवाच्या काळात वळविण्यात येणार आहे. नऊ दिवस हे आदेश लागू राहणार आहेत. केवळ दुचाकी वाहनांना हा रस्ता मोकळा राहणार आहे. मंडळांची संख्या कमीयंदा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची संख्या अगदीच नगण्य आहे. केवळ रात्रीच्या वेळी देवीचा फोटो ठेवून त्या ठिकाणी गरबा खेळला जात असतो. त्यामुळे अशा मंडळांना नोंदणीची गरज राहत नसल्याचे सांगण्यात आले.गरबा प्रशिक्षणनंदुरबारात काही संस्थांनी व व्यक्तींनी यंदा गरबा व दांडिया प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुजरातमधील विविध पद्धतीचे दांडिया व गरबा यांचे प्रशिक्षण स्थानिक व्यक्ती तसेच गुजरातमधून आलेले व्यक्ती देत आहेत. सायंकाळी असे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत.विविध वस्तूंची विक्रीबाजारात नवरात्रोत्सवानिमित्त विविध वस्तूंची विक्रीत वाढ झाली आहे. लाकडी व लोखंडी दांडिया, महिलांसाठी विविध वेशभूषेचे वस्त्र, मेकअपचा सामान यासह इतर वस्तूंचा समावेश आहे. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आल़े