शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी बोरद येथे पीक करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 12:58 IST

तापमानाचाही बसतोय फटका : आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 28 : तळोदा तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पाण्याअभावी पिक करपू लागली आहेत़ तसेच ऐरवी 25 मेस होणारी कापूस लागवडसुध्दा पाण्याअभावी यंदा उशिरा करण्यात येणार असल्याचे परिसरातील शेतक:यांकडून सांगण्यात आल़ेतळोदा तालुक्यातील बोरद, मोड, तळवे, आमलाड, प्रतापपूर, खरवड, त:हावद, कढेल, लाखापूर, करड आदी परिसरात भिषण पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आह़े त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांनी कापूस लागवड यंदा उशिरा करण्याचा निर्णय घेतला आह़े सध्या तापमानाचा पारा चांगलाच वर चढला आह़े गेल्या दोन महिन्यांपासून तापमान चाळीशी पार गेल्याने एकीकडे जीवाची लाही लाही होत आहे, तर दुसरीकडे पीक जगवताना शेतक:यांना एकना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े शेतक:यांनी कुपनलिकांमध्ये दोनशे ते अडीचशे फुटांपर्यत सबमर्शिबल पंप सोडले आहेत़ तरीसुध्दा पाहिजे त्या प्रमाणात पाणी ओढले जात नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े या परिसरात कापसाची लागवड 25 मे नंतर होण्याचे हे पहिलेच वर्ष असल्याचे जुन्या जाणत्यांकडून सांगण्यात येत आह़े महावितरणकडूनही दररोज केवळ  3 ते 4 तासच कृषिपंपांना वीजपुरवठा पुरविण्यात येत असतो़ त्यातही तो असमान दाबाचा असल्याने शेतक:यांकडून पीकांना पुरेशा प्रमाणात पाणीसुध्दा दिले जात नसल्याचे सांगण्यात आल़े दरम्यान, रात्रीबेरात्री वीजपुरवठा होत असतो़ त्यामुळे शेतक:यांना आपला जीव धोक्यात टाकून पीकांना पाणी द्यायला जावे लागत असत़े आधीच परिसरात बिबटय़ांचा वावर आह़े त्यातच अवेळी पाणी द्यायला जाताना शेतक:यांच्या अंगावर काटा उभा राहत असतो़ दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आह़े त्यामुळे पाण्याच्या विवंचनेमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आह़े वाढत्या तापमानामुळे येथील लघुप्रकल्पसुध्दा कोरडे पडत आहेत़ त्यामुळे पशुपालकांसमोर समस्या वाढत आह़े पाणी नसल्याने परिसरातील मोजक्या विहिरींमध्ये मोटारी टाकून त्या माध्यमातून पाणी ओढले जात असल्याच्या व्यथा येथील शेतक:यांकडून सांगण्यात येत आहेत़