शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ांचा संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 13:13 IST

तळोदा तालुका : गावालगतच्या शेतशिवारात बिबटय़ा व त्याच्या पिल्लूंचे वास्तव

तळोदा : गावाला लागून असलेल्या शेत शिवारात दिवसा ढवळ्या बिबटय़ा व त्याच्या पिल्लांचा संचार वाढल्यामुळे बोरद परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे या शेताला लागूनच शाळेचे पंटागण आहे. याठिकाणी विद्यार्थी खेळत असतात. साहजिकच त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने याप्रकरणी गंभीर दखल घेवून तातडीने हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.बोरद येथील शेतकरी सातपुडा साखर कारखान्याचे संचालक सुनील मुरार पाटील यांचे गावाला लागून शेत आहे. या क्षेत्रात त्यांनी केळीची लागवड केली आहे. त्यामुळे या केळीच्या शेतात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट मादी व तिच्या पिल्लांचा वावर आहे. अगदी दिवसा ढवळ्या हे प्राणी या शेताला लागून असलेल्या मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या पटांगणात सुद्धा वावरत असल्याचे गावक:यांच्या निदर्शनात आले आहे. त्यांच्या मुक्त संचारामुळे साहजिकच बोरद परिसरातील गावक:यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबटय़ाने शुक्रवारी दोन शेळ्यादेखील फस्त केल्या होत्या. बिबटय़ाच्या भीतीमुळे शेतातील रखवालदार शेतात जाण्यास धजावत नसल्यामुळे गहू, हरभरा, पपई, केळी आदी पिकांना पाणी देताना शेतक:यांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. ऊसतोड मजुरांनीदेखील तेथून पळ काढला आहे. त्यांनी गावात आपले बिस्तार बसविले आहे. त्यांनी ऊस तोड थांबविल्यामुळे उसाच्या तोडी बंद झाल्या आहेत.वास्तविक या हिंस्त्र प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याबाबत येथील वनविभागाकडे अनेक वेळा तोंडी, लेखी तक्रारी केल्या आहेत. तरीही वनविभागाने तातडीने  कार्यवाही केलेली नाही. वनविभागाचे अधिकारी जीवित हानी होण्याची           वाट पहात आहेत का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. वनविभागाने तत्काळ दखल घेवून बंदोबस्त करावा अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा गावक:यांनी केला आहे.