शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढल्याने भाजीपाला दरात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 12:12 IST

गृहिणींमध्ये समाधान : अवकाळी पावसामुळे बसला होता मोठा फटका

ठळक मुद्देभाज्यांचे सर्वसामान्य दर.. (दर किलोत) प्लॉवर 50 रुपये किलो तसेच गिलोडी 30, दुधी भोपळा 30, गवाराच्या शेंगा 60, वांगे 40, भेंडी 40, कारले 50, पालक 40, पोकळा 40, कोथंबीर 60 ते 70, काकडी 20, लिंबू 30, शिमला मिरची 60, साधी मिरची 30, बटाटे 15, नवा कांदा 30, जु

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवाळीच्या काळात आभाळाला भिडलेले भाजीपाल्याचे दर आवक वाढल्याने काहीसे घटले आह़े बाजारपेठेत नवीन भाजीपाल्याची आवक वाढल्याने या दरात घसरण झाली असल्याचे भाजीपाला विक्रेत्यांकडून सांगण्यात आल़े भाजीपाला दरात घट होण्याचे कारण काहीही असो़ मात्र यामुळे गृहिणींकडून मात्र समाधान व्यक्त करण्यात येत आह़े अवकाळी झालेल्या पावसामुळे  भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होत़े त्यामुळे साहजिकच भाजीपाल्याची आवकही घटली होती़ त्यामुळे भाजीपाला दरात मोठी वाढ झाली होती़ मेथी, कोथंबीर, पालक आदी भाज्यांनी तर शंभरी पार केली होती़ कोथंबीर दिवाळीच्या दिवसांमध्ये 300 रुपये किलोनेदेखील विकली जात होती़ त्यामुळे साहजिकच ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी वाढली होती़ भाज्यांच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे तर चांगलेच कंबर मोडले होत़े भाजीपाला महाग त्यातच डाळींच्या दरातही वाढ झाल्याने खायचे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला होता़ परंतु त्यानंतर आता बाजारपेठेत नवीन भाजीपाला येऊ लागल्याने भाज्यांच्या दरात पुन्हा घट झाली आह़े हिवाळ्याचे सुरुवात झाली असल्याने या दिवसांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असत़े त्यामुळे काही दिवसांमध्ये भाजीपाल्यांच्या दरात पुन्हा घट होणार असल्याचाही अंदाज व्यक्त होत आह़े