शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर महागल्याने ग्रामीण भागात पुन्हा पेटू लागल्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST

पूर्वीही चुलींचाच वापर प्रामुख्याने ग्रामीण भागात असायचा. मात्र, घरातील निघणारा धूर कमी व्हावा व महिलांना फुप्फुसाचा त्रास होऊ नये, ...

पूर्वीही चुलींचाच वापर प्रामुख्याने ग्रामीण भागात असायचा. मात्र, घरातील निघणारा धूर कमी व्हावा व महिलांना फुप्फुसाचा त्रास होऊ नये, तसेच जंगल तोड कमी करण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत घराघरात गॅस पोहोचले आहेत. मात्र, आता सिलिंडरचे दर एकदमच वाढल्यामुळे अनेक घरांमध्ये गॅसचे सिलिंडर आता रिकामेच पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाकडून गॅस कनेक्शन मिळाल्याने काही दिवस आनंद मिळाला. आता मात्र गॅसचे सिलिंडर भरण्यासाठी ८५० रुपये लागत असल्यामुळे महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. अनेकांसाठी ही रक्कम मोठीच आहे. त्यामुळे सिलिंडर शोपीस ठरले असून, गॅसचा आनंद काही दिवसांसाठीचाच ठरला. ग्रामीण भागात कोविडची परिस्थिती व पावसाने दांडी मारल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे. काम नाही, धंदा नाही. जेमतेम मजुरी मिळत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा तरी करावा लागत आहे. सिलिंडर भरण्यासाठी पैसा जमा करण्याचे अनेक सामान्य नागरिकांसमोर जणू आव्हानच आहे. ८५० रुपयात भरलेले सिलिंडर मिळत असल्यामुळे महिला पुन्हा चुली पेटवित असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन मिळाले. काही दिवसांत गॅसच्या वापर करण्याची सवय पडली. दोन महिने एक सिलिंडरचा वापर होत होता. सबसिडी मिळत असल्यामुळे सिलिंडर भरणे परवडत होते. मात्र, शासनाने सिलिंडरवरील सबसिडी जवळपास बंदच केल्याने आता महागडे सिलिंडर परवडत नाही. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे. -रूपाबाई ठाकरे, शेतमजूर महिला