शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पाऊस आणि दरडींमुळे तोरणमाळकडे जाणारे रस्ते बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाळकडे जाणा:या रस्त्यांवर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढल्याने वनविभागाकडून सतर्कता बाळगत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाळकडे जाणा:या रस्त्यांवर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढल्याने वनविभागाकडून सतर्कता बाळगत पर्यटकांना मनाई करण्यात आल्याची माहिती आह़े तोरणमाळसह परिसरात सध्या मुसळणार पाऊस सुरु असल्याने नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत़ थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला पावसाळ्यात पर्यटक मोठय़ा संख्येने हजेरी लावतात़ यंदाही पावसाची स्थिती चांगली असल्याने पर्यटक येथे गर्दी करत होत़े दरम्यान गत आठवडय़ापासून पावसाने जोर धरल्याने सातपायरी घाटात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली होती़ यातून जागोजागी रस्ते बंद झाले आहेत़ यात लेंगापाणीजवळ रस्त्यावर रस्त्याचा भराव वाहून गेला आह़े काही ठिकाणी रस्ता खचल्याचेही दिसून आले आह़े यापाश्र्वभूमीवर म्हसावद पोलीस ठाणे, तालुका प्रशासन आणि वनविभागाने दक्षता घेत वाहतूक सोमवारपासून बंद केली होती़ बुधवारी स्थिती सामान्य होत असताना गुरुवारी पहाटेपासून पाऊस सुरु झाल्याने रस्त्यांवर पाणी वाहून येत आह़े यातून रस्ता खचण्याची भिती असल्याने पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आह़े पावसामुळे सातपायरी घाटासह कालापाणी परिसरात कोसळलेल्या दरडी काढण्यास अडचणी येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े तोरणमाळ मंडळात दरवर्षी जून महिन्यात सरासरी 427 मिलीमीटर पाऊस होतो़ त्यातुलनेत 30 जूर्नयत या भागात 131 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आह़े जुलैमध्ये येथे सरासरी 376 मिलीमीटर पाऊस होतो़ त्यापैकी 31 जुलैअखेर येथे 306 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती आह़े तर ऑगस्ट महिन्यात सरासरी 499 पावसापैकी आठ ऑगस्टअखेरीस 254 मिलीमीटर पाऊस येथे कोसळला आह़े 8 ऑगस्ट रोजी मंडळात 49 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़