शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आयकर विवरण सक्तीमुळे ग्रामसेवकांची होतेय धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 12:15 IST

नंदुरबार : गत पाच वर्षात केंद्र आणि राज्यशासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे कोट्याधीश झालेल्या ग्रामपंचायतींना आयकर विवरण भरण्याची सक्ती आहे़ हे ...

नंदुरबार : गत पाच वर्षात केंद्र आणि राज्यशासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे कोट्याधीश झालेल्या ग्रामपंचायतींना आयकर विवरण भरण्याची सक्ती आहे़ हे विवरण न सादर करणाºया जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींना आयकर विभागाच्या टीडीएस विभागाने तात्पुरत्या नोटीसा बजावल्याने इतर गामसेवक आयटी रिटर्न दाखल करण्यासाठी धावपळ करत आहेत़९५२ गावे व ५८६ ग्रामपंचायती असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पेसा आणि १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना निधी मिळत असल्याने त्यांची विकासकामे वाढली आहेत़ वर्षभर होणाºया या खर्चाची माहिती शासनाला सादर करण्यासोबत आयकर विवरण भरणेही सक्तीचे करण्यात आले होते़ दरम्यान १ आॅक्टोबर २०१८ पासून प्रत्येक ग्रामपंचायतीला जीएसटी आणि पॅन क्रमांक सक्तीचा करण्यात आला होता़ यानुसार कार्यवाही न करणाºया २० ग्रामपंचायतींना आयकर विभागाच्या टीडीएस अर्थात टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स या विभागाने नोटीसा बजावल्या आहेत़ जळगाव येथील टीडीएस विभागाने ही कारवाई केली असून गोपनियतेचे कारण देत त्यांनी गावांची नावे सांगण्यास नकार दिला आहे़ यंदा ३० एप्रिल ही आयकर विवरण सादर करण्याची अंतीम मुदत आहे़ आयकराचे विवरण सादर न केल्यास २० हजार रुपयांचा दंड किंवा ग्रामपंचायतीवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे आयकर विभागाने कळवले होते़ परिणामी जिल्ह्यातील ग्रामसेवक चाटर्ड अकाउंटंटकडे वारंवार चकरा मारत असल्याचे चित्र आहे़ग्रामसेवकांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शहरातील इंदिरा मंगल कार्यालयात काही दिवसांपूर्वी कार्यशाळा घेत जिल्हा परिषदेचे अधिकारी, यशदाचे मास्टर ट्रेनर आणि चाटर्ड अकाउंटंट यांनी ग्रामसेवकांना सविस्तर मार्गदर्शन केले होते़ डीएनई १३६ या ग्रामसेवकांच्या संघटनेने यासाठी पुढाकार घेतला होता़ ई- पंचायत, ई-निविदा, जीएसटी, टीडीएस आणि इतर शासकीय कपाती विषयी मार्गदर्शन करण्यात आले होते़ यानंतरही अनेक ग्रामसेवकांच्या समस्या ‘जैसे थे’ काहींचा जिल्हा व तालुकाबदल झाल्याने गेल्या वर्षाच्या बिलांचे सादरीकरण करण्यात अडचणी येत आहेत़तूर्तास ग्रामसेवकांच्या अडचणी वाढवण्यात निवडणूकाही कारणीभूत ठरत असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे़