शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खर्दे खुर्द गावाला दुष्काळाची झळ 15 दिवसातून एकदाच ठिबकतो नळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खर्दे खुर्द : नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत असून या ग्रामीण जनता ...

लोकमत न्यूज नेटवर्कखर्दे खुर्द : नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत असून या ग्रामीण जनता होरपळत आह़े खर्दे खुर्द ता़ नंदुरबार येथेच पाण्याच्या तिन्ही विहिरी पूर्णपणे कोरडय़ा झाल्या असून 15 दिवसांतून एकदा नळाला येणारे पाणीही पुरेसे ठरत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत़ धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेवर खर्दे खुर्द हे साधारण 2 हजार लोकसंख्येचे गाव आह़े शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या या गावाला पाणीटंचाई नित्याची आह़े लगतच्या धुळे जिल्ह्यातील मालपूर गावात उभारलेल्या अमरावती प्रकल्पातून पाणी मिळणार अशी भाबडी अपेक्षा गेल्या 10 वर्षापासून बाळगत येथील शेतकरी शेती करत आहेत़ गेल्यावर्षी खरीप हंगामात पावसाअभावी पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होत़े गत खरीप हंगामातील हे दुष्टचक्र यंदाचा खरीप हंगाम येऊनही कायम आह़े यात आता पाणीटंचाई मोठी भर घालत असून पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत़ खर्दे खुर्द ग्रामपंचायतीने अमरावती नदीजवळ, गावस्मशानभूमी आणि गावाच्या बाहेर अशा तीन विहिरी खोदून गावासाठी पाणी पुरवठा केला होता़ परंतू चार महिन्यांपूर्वी या तिन्ही विहिरी पूर्णपणे आटल्या होत्या़ यावर मात करण्यासाठी प्रशासनाने गावातील एका शेतक:याची कूपनलिका अधिग्रहीत केली आह़े परंतू त्यात पाणीच नसल्याने 2 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात 15 दिवसातून एकदा पाणी पुरवठा सुरु आह़े हे पाणीही 10 ते 15 मिनीटांच्यावर सुरु राहत नसल्याने पाण्यासाठी महिला आणि पुरुषांची शेतशिवारात वणवण सुरु होत आह़े