शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी स्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यात केवळ 40 टक्के पेरण्या झाल्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:15 IST

नंदुरबार : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळीस्थितीमुळे 40 टक्के क्षेत्रात रब्बी पेरण्यात आजअखेरीस पूर्ण झाल्या आहेत़ यात सर्वाधिक कमी 13 ...

नंदुरबार : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळीस्थितीमुळे 40 टक्के क्षेत्रात रब्बी पेरण्यात आजअखेरीस पूर्ण झाल्या आहेत़ यात सर्वाधिक कमी 13 टक्के पेरणी नंदुरबार तर सर्वाधिक 146 टक्के रब्बी पिकांच्या पेरण्या अक्कलकुवा तालुक्यात झाल्या आहेत़जिल्ह्यात यंदा पावसाने लावलेल्या अल्प हजेरीमुळे तीन तालुक्यात दुष्काळ तर 1 तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती आह़े तसेच अक्कलकुवा तालुक्यातील दोन मंडळातही नुकताच दुष्काळ जाहिर करण्यात आला आह़े खरीपात उत्पादनच हाती न आल्याने अनेक शेतक:यांमध्ये औदासिन्य आह़े यातच पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने जिल्ह्यात डिसेंबर्पयत सरासरी 70 टक्के पेरण्या पूर्ण होतात़ परंतू यंदा केवळ 40 टक्के क्षेत्रावर रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ नंदुरबार तालुक्यात 1 हजार 165, नवापूर 6 हजार 642, शहादा 7 हजार 325, तळोदा 3 हजार 536, अक्कलकुवा 3 हजार 104 तर धडगाव तालुक्यात 3 हजार 665 हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ नंदुरबार केवळ 13 टक्के रब्बी पिके असल्याने येथील दुष्काळाची वास्तवता समोर येत आह़ेजिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू आणि मका या तीन पिकांना प्राधान्य दिले जात़े यंदाच्या हंगामात आजअखेरीस नंदुरबार 566, नवापूर 3 हजार 247, शहादा 2 हजार 108, तळोदा 943, अक्कलकुवा 25 तर धडगाव तालुक्यात 860 हेक्टर असा एकूण 7 हजार 749 हेक्टर गहू पेरण्यात आला आह़े जिल्ह्यात रब्बी हंगामात किमान 21 हजार 123 हेक्टवर गहू पेरा होण्याची अपेक्षा असत़े परंतू ही अपेक्षा केवळ 37 टक्केच पूर्ण होऊ शकली आह़ेदुसरीकडे रब्बी ज्वारीच्या क्षेत्रही खालावले असून नंदुरबार तालुक्यात केवळ 10, नवापूर 1 हजार 103, शहादा 1 हजार 198, तळोदा 742, अक्कलकुवा 2 हजार 170 तर धडगाव तालुक्यात 20 हेक्टर अशी एकूण 5 हजार 243 हेक्टर ज्वारी पेरणी झाली आह़े यासोबत 1 हजार 848 हेक्टर मका पेरणी पूर्ण करण्यात आली आह़े गेल्या काही वर्षात शेतक:यांच्या पसंतीमुळे ऑक्टोबर महिन्यापासून पेरणीला सुरुवात होणारा हरभराही निम्मेच ठिकाणी दिसून येत आह़े सर्वसाधारण 20 हजार हेक्टरक्षेत्रापैकी केवळ 10 हजार 339 हेक्टर हरभरा पेरणी झाली असून नंदुरबार तालुक्यात केवळ 581 क्षेत्रात हरभरा पेरणी पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े यंदा दाळवर्गीय आणि तेलवर्गीय पिकांची स्थिती कमकुवत झाल्याने चिंता व्यक्त होत आह़े