शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचार विभागाच्या दिरंगाईमुळे ग्राहक वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : सातपुडय़ात सर्वाधिक सहाय्यकारी ठरणारी दूरसंचार विभागाची मोबाईल सेवा गत दोन दिवसांपासून पुन्हा बंद पडली ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : सातपुडय़ात सर्वाधिक सहाय्यकारी ठरणारी दूरसंचार विभागाची मोबाईल सेवा गत दोन दिवसांपासून पुन्हा बंद पडली आह़े दूरसंचार विभागाने वीज बिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीने कनेक्शन पुन्हा कापले आह़े दरम्यान दूरसंचार विभागाच्या अधिका:यांनी केलेल्या विनंतीआधारे धडगाव आणि काकर्दा येथील टावर सुरु असून शनिवार्पयत बील न भरल्यास ही जोडणीही बंद होणार आह़े      दूरसंचार विभागाकडे वीज वितरण कंपनीचे साधारण साडे आठ लाख रुपयांपेक्षा अधिक वीज बिल थकीत होत़े त्यांच्याकडून विभागाला नोटीसा देण्यात आल्या होत्या़ कंपनी आणि दूरसंचार विभाग यांच्यात चर्चा झाल्यानंतर मुदतवाढ देऊन निपटारा केला गेला होता़ परंतू मुदतवाढ देऊनही दूरसंचार विभागाने तालुक्यात उभारलेल्या आठ टावरचे विजबिल न भरल्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सर्व आठ टावरचे  वीज कनेक्शन कापण्यात आले होत़े यानंतर पुन्हा तोडगा निघून सेवा सुरु झाली़ परंतू गत दोन दिवसांपासून केवळ धडगाव आणि काकर्दा हे दोन  टावर सुरु ठेवत उर्वरित सहा टावरचे कनेक्शन कापले आह़े शनिवार्रयत बील न भरल्यास कंपनीकडून वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े वीज बिलासाठी असलेला निधीच न आल्याने दूरसंचार हतबल झाल्याचे सांगण्यात येत आह़े या प्रकारामुळे ग्राहक वेठीस धरले जात असून दूरसंचार सेवेतील ब्रॉडबँड पूर्णपणे बंद पडल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत़ यामुळे साधारण 60 हजार नागरिकांना फटका बसला आह़े याबाबत ग्राहकांना अधिकृत माहिती नसल्याने त्यांच्याकडून शासकीय कार्यालयात चौकशा सुरु होत्या़ परंतू दूरसंचारची वीज कापली गेल्याची माहिती मिळाल्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात आली़ दूरसंचार बंद झाल्याने तालुक्यातील नागरिक संपर्कहीन झाले आहेत़धडगाव येथील स्टेट बँकेसह इतर राष्ट्रीयकृत बँक आणि मिनीबँकांचे व्यवहार दोन दिवस बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती़ सेतू केंद्रासह तलाठींकडून मिळणारे विविध ऑनलाईन दाखल्यांसाठी नागरिकांची फिरफिर होत होती़ वीज कनेक्शन कापलेल्या दूरसंचार विभागाच्या मोबाईल टावरचे सहा महिन्यांपासून वीज बिल भरण्यात आलेले नसल्याची माहिती समोर येत आह़े शनिवारी तोडगा न निघाल्यास ग्राहकांना सेवा बंद पडल्याचा भरुदड सोसावा लागणार आह़े दूरसंचार विभागाच्या धडगाव येथील मुख्य कार्यालयाचे वीज बिल हे तीन लाख रुपये असल्याने वीज पुरवठा बंद करण्यात आला होता़ दूरसंचार विभागाने विनंती केल्यानंतर काकर्दा आणि धडगाव येथील वीज पुरवठा सुरु केला तर दुसरीकडे तोरणमाळ, घाटली, कात्री, सुरवाणी, सिसा, खुंटामोडी, खामला आणि चुलवड येथील टावर बंद आहेत़ तोरणमाळ टावरचे 15 हजार 20, घाटली 7 हजार, कात्री 30 हजार 40, सुरवाणी 15 हजार 300, सिसा 20 हजार 556 तर खुंटामोडी येथील दूरसंचार विभागाच्या टावरचे वीजबिल 24 हजार 70 रुपये थकले आहेत़ एकूण 8 लाख 31 हजाराचे हे बिल भरण्याबाबत दूरसंचार विभागाकडे तरतूद नसल्याचे दिसून आले आह़े 6 ते 10 ऑगस्टदरम्यान धडगाव तालुक्यात अतीवृष्टीमुळे दूरसंचार सेवा 15 दिवसांर्पयत बंद होती़ आता पुन्हा सेवा बंद पडल्याने ग्राहकांना नाहकचा त्रास सुरु आह़े यात धडगाव व परिसरात ब्रॉडबँड सेवा वापरणा:या व्यावसायिकांना 15 दिवस सेवा बंद असूनही महिन्याचे बील द्यावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची अपेक्षा आह़े धडगाव तालुक्यातील बँका आणि शासकीय कार्यालयांमध्ये ऑनलाईन कामेच होत नसल्याने चिंता वाढल्या आहेत़ शनिवारी योग्य तोडगा न निघाल्यास सेवा पुन्हा बंद पडण्याची भिती आह़े याठिकाणी खाजगी कंपनी सेवा देत असली तरी त्यातून योग्य ते नेटवर्क नसल्याने अडचणी येत आहेत़