शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

हवेच्या दाबात घट झाल्याने खान्देशातील किमान तापमानात वाढ

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: January 12, 2019 18:49 IST

खान्देशची स्थिती : हवेचा दाब कमी झाल्याने परिणाम

ठळक मुद्दे राज्यात सध्या 1 हजार 14 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब14 ते 16 जानेवारी दरम्यान थंडीची लाट परतणारपुढील दोन दिवसात महाराष्ट्रात 1 हजार 16 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब

नंदुरबार : राज्यात सध्या 1 हजार 14 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब निर्माण झाल आह़े हवेच्या दाबात चढउतार होत असल्याने परिणामी शनिवारी उत्तर महाराष्ट्रासह राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळाल़े खान्देशातील ‘कोल्ड सिटी’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या धुळ्यात शनिवारी 11.2 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आल़े कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने उत्तरेकडून येत असलेल्या शितलहरींच्या मार्गात अडथळा निर्माण झाला असल्याचे जेष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितल़े दरम्यान, दोन दिवसात पुन्हा हवेचा दाब वाढणार असून यामुळे 14 ते 16 जानेवारी दरम्यान थंडीची लाट परतणार आह़े पुढील दोन दिवसात महाराष्ट्रात 1 हजार 16 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब निर्माण होण्याची शक्यता आह़े हवेचा दाब वाढल्यास थंडीत वाढ होते व हवेचा दाब कमी झाल्यास थंडीतही घट होत आह़े 3 ते 4 अंशाने झाली घटशनिवारी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व शहादा येथील किमान तापमानात सरासरी 3 ते 4 अंशाने वाढ झालेली दिसून आली़ नाशिक : कमाल  28.8 तर किमान 8.8, जळगाव : कमाल 29.7 तर किमान 10, धुळे : कमाल 30.2 तर किमान 11.2, नंदुरबार : कमाल 29.7 तर किमान 13.8 तसेच शहादा येथे किमान 11 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आह़े आठवडय़ापासून जळगाव व धुळे येथे अनुक्रमे 6 व 5 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात येत होत़े तसेच शहादा येथेही गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमान 7 अंश सेल्सिअस इतके होत़े परंतु शनिवारी सर्वच ठिकाणी किमान तापमानात वाढ बघायला मिळाली आह़े हवेच्या दाबात मोठय़ा प्रमाणात चढउतार होत असल्याने परिणामी थंडीतही लक्षणीय बदल दिसून येत आहेत़ येत्या दोन ते तीन दिवसात खान्देशात पुन्हा थंडीची लाट परतणार असल्याचा इशारा आयएमडीतर्फे देण्यात आला आह़े     (स्त्रोत : आयएमडी, पुणे)

महाराष्ट्रात सध्या 1 हजार 14 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब निर्माण झाला आह़े सध्या हवेचा दाब कमी असल्याने थंडीत घट होऊ शकत़े परंतु दोन दिवसात पुन्हा थंडी परतणार आह़े-डॉ़ रामचंद्र साबळे, जेष्ठ हवामान तज्ज्ञ