शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनात 25 टक्क्यांनी घट येण्याची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 13:49 IST

पावसाची 15 ते 17 टक्के तूट : नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुव्यात बिकट स्थिती

नंदुरबार : दोन तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली तरी जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये पीक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या भागात उत्पादकता 20 ते 25 टक्यांनी घटनार आहे. येत्या काळात देखील समाधानकारक पाऊस झाला नाही तर पाणी टंचाईचाही सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यातील नवापूर व धडगाव तालुका वगळता इतर तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्येही ठणठणाट आहे.  दरम्यान, जिल्ह्यात अद्यापही 15 ते 17 टक्के पावसाची तूट कायम आहे.  गेल्या आठवडय़ात गुरुवार व शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे पावसाची सरासरी 50 टक्केच्या वर गेली आहे. सरासरी वाढली असली पीक परिस्थिती फारशी समाधानकारक नसल्याची स्थिती आहे. विशेषत: नंदुरबार तालुक्याचा पूर्व भाग आणि शहादा तालुक्यातील तापी पट्टय़ाच्या भागात बिकट परिस्थिती आहे. पिकांची वाढ खुंटलीनंदुरबार, शहादा, तळोदा या तीन तालुक्यांमध्ये आणि अक्कलकुवा तालुक्यातील सपाटीवरील भागात अपेक्षीत पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे शेतक:यांमध्ये चिंता वाढली आहे. मका, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस यांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात 20 ते 25 टक्यांनी घट येण्याची शक्यता आहे. येत्या काळातही पाऊस न आल्यास कापूसला मोठा फटका बसणार आहे. चार तालुक्यांची सरासरी कमीएकुण पावसाच्या सरासरीच्या तुलनेत नंदुरबार, शहादा, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील पावसाची सरासरी 10 ते 25 टक्क्यांनी कमी आहे. नंदुरबार तालुक्यात सरासरी  41 टक्के पाऊस झाला आहे. येथे जवळपास 15 टक्के पावसाची तूट आहे. शहादा तालुक्यात सरासरीचा 47 टक्के पाऊस झाला आहे. येथे 17 टक्के तूट आहे. तळोदा तालुक्यात 50 टक्के पाऊस झाला आहे. येथे सरासरी तूट 12 टक्के आहे. अक्कलकुवा तालुक्यात 47 टक्के पाऊस झाला आहे. येथे तूट 14 टक्के आहे. नवापूरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुट जवळपास भरून निघाली आहे. तर धडगाव तालुक्यात 70 टक्के पाऊस होऊन येथे सरासरीच्या तुलनेत पाच ते सात टक्के अधीक पाऊस झाल्याची नोंद आहे.  अवघा 36 टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील 37 लघु व चार मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी अवघा 36 टक्के पाणीसाठा आहे.  37 लघु प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांमध्ये थेंबभरही पाणी नाही तर दहा प्रकल्पांमध्ये 25 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांपैकी केवळ रंगावली प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. शिवण प्रकल्पात 19 टक्के तर दरा 80 व राणीपूर 60 टक्के भरले आहेत.जिल्ह्यातील विविध लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा पुढील प्रमाणे : हळदाणी 63 टक्के, खडकी सहा टक्के, खेकडा 76 टक्के, खोकसा 97 टक्के, मेंदीपाडा 20 टक्के, मुगधन 57 टक्के, नावली तीन टक्के, रायंगण, 80, सोनखडकी 23, सुलीपाडा 13, विसरवाडी 74, आंबेबारा 34, धनीबारा 30, खोलघर 28, कोकणीपाडा 5, पावला 5, शनिमांडळ 3, शिरवाडे 62, ठाणेपाडा 2- 15, ठाणेपाडा1- 5 , वासदरा 0, वसलाय 32, वावद 0, दुधखेडा 21, खापरखेडा 35, कोंढावळ 26, लगंडीभवानी 5, लोंढरे 8, राणीपूर 62, शहाणे 17, खडकुना 75, गढावली 0, महुपाडा 22, पाडळपूर 25, रोझवा 22, सिंगसपूर 58, उमराणी 27 टक्के पाणीसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पात रंगावली प्रकल्प ओव्हरफ्लो आहे. विरचक प्रकल्पात 20 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरा प्रकल्पात 82 टक्के पाणीसाठा आहे.