शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 11:56 IST

शेत:यांकडून व्यक्त होतेय चिंता : पाऊस न आल्यास पिक वाया जाण्याची भिती

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे परिसरात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आह़े तसेच मोटारीदेखील वीज नसल्याने अल्पकाळ सुरु राहत असल्याने पिकांना पाणी द्यावे कसे अशी विवंचना शेतक:यांसमोर उभी आह़ेपावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले असूनही गावातील बहुतेक कुपनलिका, विहीरी कोरडय़ाठाक पडल्या आहेत़ तसेच पाण्याची पातळीही खोल गेली आह़े यामुळे पिकांना जगवावे कस  अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत़ त्यामुळे कधी एकदा दमदार पाऊस येतो या आशेने शेतक:यांची डोळे आभाळाकडे लागले आहेत़ नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, शिंदे, कोळदे, पळाशी, खोंडामळी, विखरण, बामडोद, पातोंेडा, पथराई आदी परिसरात पावसाने ब:याच दिवसांपासून तळी मारली आह़े त्यामुळे या परिसरातील शेतकरी चांगलेच चिंताग्रस्त झाले आहेत़ येथील पिकांना जगवणे शेतक:यांना जड जात आह़े दरम्यान, या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून तुरळकच पाऊस झाला असून तोही कुठे झाला तर कुठे झालाच नसल्याची स्थिती आह़े त्यामुळे जणू उन्हाळ्याचेच दिवस असल्यासारखी स्थिती विहीरी व कुपनलिकांची झाली आह़े त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतक:यांना मोठी कसरत करावी लागत आह़े विहीरीत पाणी कमी झाले असल्याने शेतकरी विद्युत मोटारी विहीरीत सोडत मिळेल तेवढे पाणी ओढण्याचा   प्रयत्न करीत आह़े व या माध्यमातून आपली पिक जगवित आह़े परिसरात मोठय़ा प्रमाणात ऊस, कापूस, ज्वारी, मका आदी पिके घेण्यात आली      आह़े यंदा पावसाळा लवकर असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होत़े त्यामुळे परिसरातील बहुसंख्य शेतक:यांनी  पेरणी केली होती़ परंत  त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने अनेक शेतक:यांची पिक पाण्याअभावी जळाली होती़  काही शेतक:यांकडून कर्ज काढून दुबार पेरणी करण्यात आली होती़ आताही बहुतेक शेतक:यांवर तिस:यांदा पेरणी करण्याचे  संकट ओढावले आह़े त्यामुळे  इकडून-तिकडून कर्ज घेऊन जेमतेम पेरणी, बि-बियानांचा खर्च करुन शेतकरी पिक जगविण्यासाठी धडपड करीत असताना दुसरीकडे मात्र निसर्ग साथ देत नसल्याने शेतक:यांसमोर दुहेरी संकट निर्माण झालेआह़े दरम्यान, येत्या काळात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आह़े त्यामुळे हा तरी अंदाज खरा ठरावा अशी अपेक्षा आता शेतक:यांकडून व्यक्त होत आह़े