शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील कुपनलिकांना येतेय दरुगधीयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:39 IST

नंदुरबारातील प्रकार : भुमिगत गटारींचे पाणी ङिारपत असल्याची शक्यता

नंदुरबार :  भुर्गातील पाणी पातळी खोल गेल्याने नंदुरबार शहरातील खाजगी कुपनलिकांचे पाणी दुषीत येवू लागले आहे. रेल्वे पट्टयापलिकडील विशेषत: कन्यादान मंगल कार्यालपासून थेट नळवा शिवार्पयत तसेच वाघोदा शिवारातील काही वसाहतींमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांनी कुपनलिका बंद करून ठेवल्या असून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.शहरातील अनेक भागात पाण्याची पातळी कमालीची खोल गेली आहे. अनेक नागरिकांनी केलेल्या कुपनलिका कोरडय़ा पडल्या आहेत. काही ठिकाणी जेमतेम पाणी असले तरी त्यातून दरुगधीयुक्त पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे कुपनलिकाधारक नागरिकांना आता विकतचे पाणी वापरावे लागत आहे.नवीन वसाहतींच्या भागात नागरिक घर बांधकाम करतांनाच कुपनलिका करून घेतात. त्यामुळे पालिकेची नळजोडणी ते घेत नाहीत. शहरात आतार्पयतचा इतिहास पहाता तीव्र पाणी टंचाईची स्थिती कधी जाणवली नव्हती. त्यामुळे मे, जून महिन्यार्पयत खाजगी कुपनलिका सुरू राहत असे. यंदा मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने कुपनलिकांच्या पाण्याची पातळी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातच खोल गेली होती. अनेक नागरिकांना कुपनलिकेतील विद्युत मोटार आणखी खोल टाकावी लागली आहे. आता मात्र, पाण्याचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुपनलिका बंद करून ठेवल्या आहेत.दरुगधीयुक्त पाणीनळवा रस्त्यावरील तसेच मिशन विद्यालयाच्या मागील बाजूच्या वसाहतींमधील कुपनलिकांना सध्या दरुगधीयुक्त पाणी येऊ लागले आहे. आधीच पाण्याची पातळी खोल त्यात दरुगधीयुक्त पाणी येवू लागले आहे. हे पाणी पिण्यालायक नसल्याचे चित्र आहे. कुपनलिकांना दरुगधीयुक्त पाणी येण्याचे कारण काय? असा प्रश्न नागरिकांना सतावतो आहे. जर भुगर्भात पाणीच नाही तर पिवळ्या रंगाचे आणि दरुगधीयुक्त पाणी कसे बाहेर येत आहे याबाबतही चर्चा सुरू आहे. पालिकेने तपासणी करावीशहरातील पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करण्याचे काम पालिकेचे असते. परंतु अशा प्रकारची तपासणी अनेक वर्षापासून झालेली नसल्याचे सांगण्यात आले. विरचक आणि आंबेबारा धरणातून पाणी पुरवठा होत असल्यामुळे शहरातील इतर स्त्रोतांमधून होणारा पाणी पुरवठा हा पिण्यासाठी केला जात नाही. त्यामुळे अशा ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्याची आवश्यकता नसल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. खाजगी कुपनलिकाधारकांना स्वत:च पाण्याची तपासणी करून घ्यावी लागत असते.उताराचा भाग आणि ड्रेनेजचे पाणीशहरातील सर्व भागाचा उतार हा नळवा रोडवरील भागात आहे. त्यामुळेच पालिकेने नळवा शिवारात पाताळगंगा नदीच्या काठावर सिल्व्हर ट्रीटमेंट प्लान्ट अर्थात ड्रेनेजचे पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प उभारला आहे. या ठिकाणी जाणारे ड्रेनेजचे पाणी या भागातील वसाहतींमध्ये ठिकठिकाणी थाबून आहे. त्याला कारण ड्रेनेजचे चेंबर फुटणे, नादुरूस्त होणे हे आहे. त्यामुळे ते पाणी जमिनीत जिरून ते कुपनलिकांमध्ये जात असल्याचेही या भागातील नागरिकांचे म्हणने आहे. याबाबत पालिकेने चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.