शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांना गाळपेर जमिनीचा सहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 11:22 IST

सातपुडा परिसर : चाराटंचाई समस्येच्या निराकरणासाठी होताय प्रयत्न

सोमावल :   सातपुडा परिसरात कमी पर्जन्यमानामुळे पिण्याचा पाण्यासह चाराटंचाई मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने चा:यासाठी गाळपेर जमीन उपलब्ध करुन दिल्या आहेत़ त्यामुळे येथील शेतक:यांकडून दुष्काळावर मात करण्यासाठी येथील जलाशयाखालील गाळपेर जमीनीत रब्बी चारा पीक उत्पादनासाठी मशागतीचे काम करीत आहेत़येथील परिसरात घेतल्या जाणा:या तृणधान्य, कडधान्य, ऊस व तेलबिया पिकाखालील क्षेत्रामुळे मोठय़ा प्रमाणात चारा पशुधनासाठी उपलब्ध होत असतो. येथे उपलब्ध होणारा बहुतेक चारा हा पावसाळ्यात पडणा:या पाण्यावर अवलंबून             असतो. मात्र मागील 4 ते 5 वर्षाच्या कालावधीपासून येथील हवामानात आमुलाग्र बदल होत गेल्याने पावसाळ्यात होणारे पर्जन्यमान दिवसेंदिवस कमी-कमी होत गेले. हीच परिस्थिती कायम राहिल्याने यंदा ते     50 टक्के सरासरी पेक्षा ही कमी  पावसाची नोंद झाली़ त्यामुळे खरीप हंगाम पुरता वाया गेल्याची परिस्थिती आहे. बहुतेक शेतक:यांना खरीप हंगामाचा उत्पादन खर्च निघणे देखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे शेतक:यांच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध झाले नाही व पशुधनासाठी चारा देखील                म्हणावा तेवढा उपलब्ध होऊ शकला नाही.यंदा कमी झालेल्या परतीचा पावसामुळे रब्बी हंगामाची देखील पेरणीला पोषक वातावरण निर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे या हंगामात घेतल्या जाणा:या रब्बी पिकासाठी आवश्यक असलेली जमीन मशागतीची कामे वेळेत पूर्ण करता आली नसल्याची परिस्थिती आहे. दरम्यान आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध न झाल्याने रब्बी हंगामावर परिणाम झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पावसाअभावी पेरणीपूर्व पिकास आवश्यक असलेल्या जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.सध्याच्या स्थितीत हिवाळा सुरु असून देखील दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आह़े येणा:या काळात हीच परिस्थिती कायम राहिल्यास खरीपासह रब्बी हंगाम देखील वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी पुरता खचला असून या कठीण परिस्थितीत पशुधनासाठी चा:याची सोय व्हावी या हेतूने धडपडत आहे.  यावर उपाय म्हणून प्रशासनाने चा:यासाठी जलाशयाखालील गाळपेर जमिन उपलब्ध केल्याने समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, हवामानात वारंवार होणा:या आमुलाग्र बदलामुळे पावसाळ्यात होणारे पर्जन्यामान दिवसेंदिवस कमी-कमी होत असल्याने येणा:या काळात हीच परिस्थिती कायम राहिल्यास गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे प्रशासनाने यावर मात करण्यासाठी वेळीच उपाययोजनांचा बहुवार्षिक आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे.