लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात शिक्षण सोडणाऱ्यांचे प्रमाण अर्थात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणार आहे. सातवीपर्यंत शाळा सोडणाºया विद्यार्थ्यांना सर्व्हे करून शाळेच्या मुख्य प्रवाहात आणले जाते परंतु सातवी आणि दहावीनंतर शिक्षण सोडणाऱ्यांना मात्र कुणीही वाली नसल्याचे चित्र आहे.नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराचा अभाव आणि दारिद्रय रेषेखालील कुटूंबांची संख्या लक्षात घेता अर्ध्यातूनच शाळ सोडणाºयांचे प्रमाण अधीक आहे. दरवर्षी किमान ५०० ते १२०० विद्यार्थी अर्ध्यातून शाळा सोडत असतात. त्यात चौथी पास झाल्यानंतर पाचवीत प्रवेश न घेणे, जेथे जिल्हा परिषदेच्या सातवीपर्यंत शाळा आहेत तेथून आठवीत माध्यमिक शाळेत प्रवेश न घेणे व दहावी उत्तीर्णनंतर पुढे शिकण्याची उमेद नसणे असे चित्र आहे.जिल्ह्यात मजुरांचे पर्यायाने विद्यार्थ्यांचे स्थलांतराचे प्रमाण मोठे आहे. शाळाबाह्य विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. आता अर्ध्यातूनच शिक्षण सोडणाºया विद्यार्थ्यांची आकडेवारी देखील चिंतेत भर घालणारी ठरत आहे.शासनातर्फे आश्रमशाळा, वस्तीगृह, गाव तेथे शाळेची सुविधा, आंतरराष्टÑीय शाळेसारखे उपक्रम, इंग्रजी माध्यमाची निवासी आश्रमशाळा, आरटीईअंतर्गत नामांकीत शाळांमध्ये देण्यात येणारे प्रवेश अशा सुविधा आणि सोयी असतांना अध्यार्तून शिक्षण सोडलेले, शाळेत नाव आहे पण शाळेत न येणे अशा विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.जिल्ह्यातून दरवर्षी हजारो कुटूंब शेजारच्या गुजरात राज्यात किंवा इतर जिल्ह्यात सहा ते आठ महिने मजुरीसाठी जातात. अशावेळी आपल्या लहान मुलांना देखील सोबत घेऊन जातात. त्यामुळे अशा मुलांना अर्ध्यातूनच शाळ सोडावी लागते. परिणामी शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढते. जे शाळाबाह्य विद्यार्थी नंतर शाळेच्या मुख्य प्रवाहात येतात, ते पुढे टिकून राहतात. जे प्रवाहात येत नाही ते कायमचेच शाळेपासून दूरावतात. अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे.परराज्यात मजुरीसाठी गेलेल्या कुटूंबातील मुलांना परत आणून हंगामी वसतिगृहात त्यांची सोय करण्यासाठी व स्थलांतरीत होऊन आलेल्या मुलांना स्थानिक शाळांमध्ये दाखल करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.दहावीनंतर शाळा सोडणारे विद्यार्थी आपल्या गरिबीच्य परिस्थीतमुळे लागलीच रोजगार शोधत असतात. त्यामुळे ते पुढील शिक्षणापासून वंचीत राहतात.२०१८-१९ मध्ये करण्यात आलेल्या नोंदीनुसार चौथीनंतर शाळा सोडणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण ४९२ इतके होते. गेल्यावर्षी ते ३६ वर आणण्यात यश आले. शिवाय शाळेत नाव आहे, परंतु शाळेत येतच नाहीत असे विद्यार्थी ५,८३४ होते यंदा तीच संख्या गेल्यावर्षी ७३९ वर आली आहे. ३० दिवसांपेक्षा अधीक दिवस शाळेत हजेरी न लावणारे विद्यार्थी ६,३६८ होते. गेल्यावर्षी ९६९ आढळून आले. चौथीनंतर शाळा सोडल्याचा दाखला न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३,३६७ होती गेल्यावर्षी ती ५४२ इतकी राहिली.विद्यार्थ्यांनी अर्ध्यातूनच शाळा सोडू नये यासाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न असतो. यासाठी शाळा बाह्य विद्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण करणे, त्यांना शाळेत दाखल करणे, जे विद्यार्थी पटावर आहेत परंतु शाळेत येतच नाही त्यांना शाळेत आणणे, स्थलांतरीत मजुरांच्या पाल्यांसाठी हंगामी वसतिगृह सुरू करणे असे प्रयोग राबविण्यात येतात. त्यामुळे शाळा सोडणाºयांचे आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.-एम.व्ही.कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी.नंदुरबार.
चौथीनंतर शाळा सोडण्याचे प्रमाण अधीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:31 IST