नंदुरबार : भरधाव ट्रॅक्टर उलटल्याने त्याखाली दाबला जाऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना प्रकाशा-तऱ्हावद रस्त्यावर घडली. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तारसिंग भोंग्या वळवी (४२)रा.मांडवी, ता.धडगाव असे मयताचे नाव आहे. तारसिंग हा ट्रॅक्टरद्वारे साखर कारखान्यात ऊस वाहतूक करतो. शनिवारी नेहमीप्रमाणे साखर कारखान्यात ऊस खाली करून ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच ३९-एफ ४१२५) प्रकाशाकडून तरऱ्हावद पुनर्वसनकडे जात होता. त्यावळी वळणावर त्याचा ट्रॅक्टवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट रस्त्याच्या बाजुला असलेल्या खोल खड्डयात जाऊन उलटले. त्याखाली दबला गेल्याने तारसिंग वळवी याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत रागो भोग्या वळवी यांनी पोलिसांना खबळ दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अपघातान्वये नोंद करण्यात आली. तपास फौजदार कचरे करीत आहे.