शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ, सुंदर व हरीत नवापूरचे स्वप्न साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूरात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. लवकरच सांडपाणी व्यवस्थापन, विस्तारीत पाणी पुरवठा योजना मार्गी लागणार आहे. त्यामुळे क्लिन आणि ग्रीन नवापूर साकारण्यावर आपला भर राहणार असल्याची माहिती नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी ‘लोकमत’ संवाद उपक्रमात बोलतांना दिली.नवापूरच्या पहिल्या लोकनियुक्त  महिला नगराध्यक्षा हेमलता अजय पाटील यांनी बुधवारी ‘लोकमत’ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूरात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. लवकरच सांडपाणी व्यवस्थापन, विस्तारीत पाणी पुरवठा योजना मार्गी लागणार आहे. त्यामुळे क्लिन आणि ग्रीन नवापूर साकारण्यावर आपला भर राहणार असल्याची माहिती नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी ‘लोकमत’ संवाद उपक्रमात बोलतांना दिली.नवापूरच्या पहिल्या लोकनियुक्त  महिला नगराध्यक्षा हेमलता अजय पाटील यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. वरिष्ठ उपसंपादक मनोज शेलार उपस्थित होते. यावेळी बोलतांना नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी सांगितले, नवापूरात पाच वर्ष वगळता कायमच काँग्रेसची सत्ता राहिली आहे. माजीमंत्री आमदार सुरुपसिंग नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. केवळ विस्तारीत पाणी पुरवठा योजना आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प या दोन बाबी बाकी होत्या, त्या देखील येत्या काळात पुर्ण होणार आहेत. 33 कोटींची पाणी योजनानवापुरात जलशुद्धीकरण प्रकल्प तयार आहे. परंतु शहरात असलेल्या जुन्या पाईपलाईनमुळे शुद्ध पाणी पुरवठा करण्यावर मर्यादा येत आहे. त्यामुळे शहराची आगामी 20 ते 30 वर्षाची लोकसंख्या लक्षात घेवून विस्तारीत पाणी पुरवठा योजना राबविणार आहोत. सद्य स्थितीत नवापूर ग्रामपंचायत होती त्यावेळी टाकलेली पाईपलाईन कायम आहे. जलशुद्धीकरण माध्यमातून पाणी पुरवठय़ासाठी नवीन 33 कोटींची योजना प्रस्तावीत आहे. लवकरच ती मार्गी लागणार आहे.सांडपाणी प्रकल्पसद्य स्थितीत शहरातील सांडपाणी नदीत सोडावे लागत आहे. त्यामुळे प्रदुषण वाढते. परिणामी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. शहरातील सर्व सांडपाणी एका ठिकाणी साठवून त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. रिक्त पदांची संख्यापालिकेत रिक्त पदांची संख्या देखील मोठी डोकेदुखी आहे. बांधकाम, पाणीपुरवठा विभागाला अभियंता नाही. आस्थापनातील आठ जण सेवानिवृत्त झाल्यानंतर नवीन पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे रोजंदारीवरील कर्मचा:यांवर काम भागवावे लागत आहे. याबाबत जिल्हाधिका:यांकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे.222 घरकुल मंजुरपालिकेने घरकुलांसाठी अर्ज मागविले असता एकुण 2,218 जणांनी अर्ज केला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 222 जणांचे अर्ज मंजुर करून घरकुल मंजुर झाले आहे. उर्वरित घरकुलेही लवकरच मंजुर करण्यासाठी जिल्हाधिका:यांकडे पाठपुरावा राहणार आहे.क्लिन अॅण्ड ग्रीननवापूर शहर क्लिन अॅण्ड ग्रीन करण्यावर आपला भर राहणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील एक आदर्श कचरा व्यवस्थापन प्रकल्प नवापूर पालिका राबवीत आहे. कंपोष्ट खत निर्मिती करण्यात येत आहे. प्लॅस्टिक बंदीसाठी प्रभावी उपायोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी देखील आपले शहर स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी पालिकेला सहकार्य करणे आवश्यक आहे.शहर ग्रीन करण्यासाठी अर्थात जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्यासाठी पालिका सज्ज आहे. जिल्हाधिका:यांच्या आवाहनानुसार यंदाच्या पावसाळ्यात शहरातील सर्व ओपन प्लेस, सर्व रस्ते, शाळांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यावर भर राहणार आहे. त्यासाठी रोपांची उपलब्धता देखील करून घेण्यात    येत आहे. नागरिकांनी देखील एक व्यक्ती एक झाड हा संकल्प केला तर हरीत नवापूर होण्यास वेळ लागणार नाही.सौर उज्रेला प्राधान्यपालिकेचे वीज बील परवडणारे नाही. त्यामुळे किमान पथदिवे सौर उज्रेवर सुरू राहावे यासाठी सौर उर्जा प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.मालमत्ता कराची वसुली केवळ 67 टक्के झाली आहे. विकास कामांवर त्याचा परिणाम होऊ  शकतो. त्यामुळे नागरिकांनी थकीत कराची रक्कम तातडीने भरून सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका मनिष पाटील, अजय पाटील उपस्थित होते.