शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नाले सफाई औपचारिकता नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:07 IST

पालिकेकडून कामाला सुरुवात : वसाहतीनिहाय सर्व्हेची मागणी, ड्रेनेजचही दुरूस्ती करावी

नंदुरबार : पावसाळ्यात नाले, गटारी तुंबून वसाहतींमध्ये पाणी शिरण्याच्या घटना वारंवार घडत असतात. ही बाब लक्षात घेता पालिकेतर्फे मान्सूनपूर्व नाले सफाईला वेग आला आहे. शहरातील स्वच्छता ठेकेदार संस्थेतर्फे हे काम केले जात आहे. मंगळबाजारातील शहजादा नाल्याच्या सफाईपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.पावसाळ्यापूर्वीच्या कामांना नंदुरबार पालिकेने सुरुवात केली आहे. आधी शहरातील व शहरालगतचे सर्व नाले सफाई करण्यात येणार आहेत. त्यानंतर भुमिगत गटारी व त्यांचे चेंबर आणि नंतर उतारावरील घरांच्या परिसरात दरडी कोसळू नये यासाठीची उपाययोजना होणार आहे. शिवाय पडके घर व ईमारतींच्या मालकांना देखील नोटीसा दिल्या जाणार आहेत.नंदुरबारात एकुण तीन नाले आहेत. त्यापैकी दोन नाले शहरातून वाहत जातात. त्यातील मुख्य आणि मध्यवर्ती भागातून वाहत जाणारा शहजादा नाला. पूर्वी हा नाला थेट गवळीवाडा टेकडीपासून होता. कालांतराने वसाहत झाल्यानंतर तो बुजला गेला. आता त्याला मंगळ बाजारापासून भुमिगत स्वरूपात करण्यात आले आहे. त्यावर शास्त्री मार्केट भागात व्यापारी संकुल देखील बांधण्यात आले आहे. त्यामुळे या नाल्याची सफाई करणे म्हणजे मोठे दिव्य असते. परिणामी शक्य होईल तेवढ्या प्रमाणात त्याची स्वच्छता केली जाते. पावसाळ्यात गवळीवाडा, भोईगल्ली भागातून वाहून येणारे पाणी व घाण मंगळ बाजारातील भागात अडकल्यावर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरते. त्यामुळे दररोज या ठिकाणी कचरा साफ करावा लागत असतो.याशिवाय दुसरा नाला हा भोणे रस्त्याने येवून हरीभाऊ नगर, गांधीनगर, गाझीनगर या भागातून पुढे पाताळगंगा नदीला जावून मिळतो. या नाल्यात देखील परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर घाण, कचरा टाकत असल्यामुळे तो तुंबतो. सुदैवाने त्याची खोली जास्त असल्यामुळे पावसाळ्यात त्याचा फारसा त्रास होत नाही. असे असले तरी या नाल्याची देखील सफाई केली जात असते.माळीवाडा भागातून देखील नाला गेलेला आहे. त्याचीही सफाई करण्यात येणार आहे.ड्रेनेज व चेंबरची दुरूस्तीशहरात भुमिगत गटार आहे. परंतु ती सर्वच भागात यशस्वी झालेली नाही. परिणामी अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबून चेंबरमधून पाणी बाहेर येत असते. त्यामुळे अशा ठिकाणांचा सर्व्हे करून पालिकेने त्याची दुरूस्ती करावी. बऱ्याच ठिकाणी चेंबर खराब झालेले आहे. त्याचीही दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक ठरणार आहे