शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या गुणवत्तेवर निर्माण होतेय शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:54 IST

नंदुरबार : जिल्हातील १३४ जिल्हा परिषद शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरच्या देखभाल दुुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची बाब उघड ...

नंदुरबार : जिल्हातील १३४ जिल्हा परिषद शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरच्या देखभाल दुुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची बाब उघड झाली आहे़ पावसाळा जवळ असताना अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे़ विशेष म्हणजे ग्रामपंचायत विभाग व शिक्षण विभाग यांच्यात देखभाल दुरुस्तीबाबत संभ्रमावस्था आहे़सन २०११-२०१२ दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ३८६ शाळांपैकी १३४ शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर बसविण्यात आले होते़ परंतु देखभाल दुरुस्तीअभावी यातील अनेक वॉटर प्युरिफायर काम करीत नसल्याची माहिती आहे़ देखभाल दुरुस्तीचा खर्च विशेष फंडातून मिळत असला तरीही संबंधित प्रशासनाच्या मनमानी व ढिसाळ कारभारामुळे वॉटर प्युरिफायरच्या देखभाल दुुरुस्तीचे काम टाळण्यात येत असते़ त्यामुळे हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ असल्याच्या भावना जनसामान्यातून व्यक्त करण्यात येत आहेत़ पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी करणे महत्वाचे आहे़ विद्यार्थ्यांवरचे ओझे कमी व्हावे, त्यांना घरुन पाणी न आणता शाळेमध्येच शुध्द पाणी मिळावे म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत शाळेतील पाण्याच्या स्त्रोतांना वॉटर प्युरिफायर बसविण्याची योजना अंमलात आणण्यात आली होती़ त्यानंतर अनेक वर्षांनी या वॉटर प्लॅन्टमधून शुध्द पाणी येतेय की नाही? हे तपासणी करण्याचे आदेश शासनाकडून वेळोवेळी देण्यात आले आहे़ उन्हाळी सुट्या संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु होण्याच्या आत वॉटर प्युरीफायरमध्ये काही तृटी असल्यास उपाय योजना करणे गरजेचे आहे़ परंतु याबाबत माहितीची जुळवा-जुळव करण्यातच शिक्षण विभागाचा वेळ जात असल्याने पुढील कार्यवाही होणार कधी असा प्रश्न पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे़ शिक्षण विभागाने जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या सर्व वॉटर प्युरिफायरचे नमूने तपासून वॉटर प्युरिफायरमधून येणारे पाणी शुध्द आहे किंवा नाही तसेच प्युरिफायर सुस्थितीत आहे किंवा नाही, याची पडताळणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़ शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरची पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे़ पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुुषित पाण्याची समस्या निर्माण होत असते़ ग्रामीण भागात यात अधिकच भर पडत असते़ जनगणनेसोबतच इरतही अनेक शासकीय कामे थर्ड पार्टी कंपनीला लावून करण्याचे नवे फॅड सध्या प्रसिध्द आहे़ त्यामुळे पाण्याचे नमुने गोळा करणे आणि त्याची तपासणी करण्यासाठीही अशी व्यवस्था होणे गरजेचे आहे़