शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक स्वामींच्या मंदिराचे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : वर्षातून एकदा उघडणारे कार्तिक स्वामींचे मंदिर सोमवारी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी उघडण्यात आले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : वर्षातून एकदा उघडणारे कार्तिक स्वामींचे मंदिर सोमवारी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी उघडण्यात आले. मंदिर उघडल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.प्रकाशा, ता.शहादा येथे कार्तिक स्वामींचे एकमेव मंदिर असून, ते वर्षातून  एकदा उघडत असते. या मंदिरावर दर्शनासाठी या पंचक्रोशीतील भाविक गर्दी करत असतात. याप्रसंगी अनुचित प्रकार  घडू नये यासाठी शहादा उपविभागीय  पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्यासह पोलीस निरीक्षक    किसनराव नजन पाटील यांनी भेट देत मंदिर ट्रस्टींना दोन दिवसांसाठी सीसीटीव्ही कॅमेर लावण्याच्या  सूचना दिल्या आहेत. याठिकाणी दोन दिवस भाविकांची होणारी गर्दी  लक्षात घेता पोलीस प्रशासनातर्फे ट्रस्टींना विविध सूचना देण्यात  आल्या.दर्शन घेतल्यानंतर भाविकांना मंदिराच्या मागील बाजूनेच रवाना करावे. जेणेकरून या ठिकाणी गर्दी होणार नाही व येणा:या भाविकांना सहज दर्शन घेता येईल. मंदिर परिसरात कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर गाभा:यात व मंदिराबाहेर ट्रस्टींनी दोन दिवस भाडय़ाने सीसीटीव्ही कॅमेरे आणून  बसवावेत, अशी सूचना दिली. परिसरातील दुकाने वाहनतळाचे नियोजन कसे आहे याची पाहणीही केली. 

मंदिर परिसरात सोमवारपासून दुकान थाटण्यास सुरूवात झाली आहे. याठिकाणी रसवंती, पूजेचे साहित्य, नारळ विक्रेते, मनोरंजन साहित्यासह विविध देवतांचे फोटो आदी दुकाने लावण्यात आले आहे. मोरपीस विक्री करणारे सर्वात जास्त दुकान या परिसरात दिसून आलेत. या वेळी भाविकांकडून कार्तिक स्वामींना मोठय़ा प्रमाणावर मोरपीस चढविले जात असून, त्यातील दोन मोरपीस घरी घेऊन जात असतात.4मंदिर ट्रस्टींकडून भाविकांच्या सोयीसाठी याठिकाणी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गणेश व देवीच्या मंडळातर्फे प्रसाद वाटपासह पाण्याची सोय करण्यात आली आहे.