लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : कंपनी आणि शेतकरी यांच्यात तोडगा निघत नाही तोवर पाईपलाईनचे काम सुरू करण्यात येऊ नये. असा निर्णय झालेला असतानाही दडपशाही पद्धतीने कंपनीने काम सुरू केल्याचा आरोप करून शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, अन्यथा संघर्ष पेटेल असा इशारा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य भरत गावीत यांनी मंगळवारी दिला.एका खाजगी कंपनीकडून तालुक्यात पेट्रोलियम पाईप लाइन टाकली जात असून त्यासाठी शेतकº्यांना मिळणाºया जमिनीच्या मोबदल्याबाबत शेतकरी समाधानी नसल्याने पाईपलाइन टाकण्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. नवापूर तालुक्यातून जाणाºया या पेट्रोलियम पाईपलाईन बाबत अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.सी. गावीत यांनी तहसीलदार नवापूर यांना जिल्हा परिषद सदस्य भरत गावीत, भाजपाचे जिल्हा चिटणीस एजाज शेख व शेतकºयांच्या उपस्थितीत याबाबत निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, नवापूर तालुक्यातून इंडियन आॅईल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची पेट्रोलियम पाईप लाईन जात आहे. शेतकºयांनी या पाईप लाईनला विरोध दर्शविलेला असून, या संदर्भात तहसील कार्यालयात अनेक वेळा कंपनीच्या अधिकाºयांसमावेत शेतकºयांच्या बैठका झालेल्या आहेत.लॉकडाऊन सुरू होण्याआधी नंदुरबारच्या उपविभागीय अधिकाºयांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकरी, कंपनीचे अधिकारी व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. त्या वेळी चर्चेत उपविभागीय अधिºयांनी शेतकºयांचा अभिप्राय मागविला होता. तद्नंतर काही दिवसाने कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. परिणामी कंपनीच्या अधिकाºयांंना अद्यापपर्यंत शेतकºयांचे अभिप्राय घेता आले नाही व पुढील सर्व चर्चा थांबली. असे असताना कंपनीच्या अधिकाºयांनी मनमानी करीत गुंडगिरी व दादागिरी पद्धतीने गरीब आदिवासी शेतकºयांंना धमकावून पेट्रोलियम पाईपलाईनचे काम पुन्हा सुरू केले आहे. जोपर्यंत कंपनी आणि शेतकरी यांच्यात तोडगा निघत नाही तोपर्यंत पाईपलाईनचे काम सुरू करण्यात येऊ नये असा निर्णय झालेला असताना दडपशाही पद्धतीने कंपनीने काम सुरू केले आहे.शेतकºयांच्या सहनशिलतेचा अंत पाहिला जात आहे. यापुढे जर शेतकºयांच्या जमिनीवर कंपनीने काम चालू केले तर संघर्ष होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही व त्यासाठी संपूर्णत: इंडियन आॅईल कंपनीचे अधिकारी जबाबदार राहतील असे म्हटले आहे. जोवर शेतकरी आणि कंपनीचे अधिकारी यांच्या चर्चेतून मार्ग निघत नाही तोवर सुरू केलेले काम बंद करण्यात यावे अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील व त्यासाठी प्रशासन जबाबदार राहणार असा इशारा जिल्हा परिषद सदस्य भरत गावीत, अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना नंदुरबार जिल्हा अध्यक्ष आर.सी गावीत यांच्यासह रमेश गावीत काळंबा, दत्तू गावीत कामोद, नथ्थू गावीत काळंबा, विनायक गावीत, भिकन मावची, सतीश गावीत, खलील मुस्ताक ताई, दिलीप गावीत, विजय गावीत, दिलीप मावची, रंजीत गावीत, सलमोन गावीत, भानुदास गावीत, राजू गावीत व असंख्य शेतकºयांनी दिला आहे.एखाद्या प्रकल्पास ५० टक्के लोकांचा विरोध असेल तर तो प्रकल्प केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे होऊ शकत नाही. या प्रकल्पास ९० टक्के शेतकºयांचा विरोध असल्याने या पाईपलाईनचा मार्ग बदलून पहिल्या सर्वेनुसार गुजराथ राज्यातील सोनगडपासून ते महाराष्ट्र राज्याच्या पिंपळनेर पावेतो प्रस्तावित मार्गातून पाईप लाईन काढावी बहुसंख्य शेतकºयांनी सुर आवळला.केंद्र शासनाची पेट्रोलियम पाईप लाईन नवापूर तालुक्यातून जात आहे. या संदर्भात अनेक वेळा अधिकाºयांशी चर्चा झाली आहे. जो पर्यंत कंपनी आणि शेतकरी यांच्यात यशस्वी तोडगा निघत नाही तो पर्यंत पाईप लाईचे काम बंद करण्यात यावे असे ठरले होते. मात्र प्रशासनाची कोणतीही परवागी न घेता कंपनीच्या अधिकाºयांनी दडपशाही पध्दतीने काम सुरु केले आहे. ते काम ताबडतोब बंद करण्यात यावे अन्यथा मोठे जन आंदोलन करण्यात येईल.- भरत गावीत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.
तोडगा निघाल्याशिवाय काम करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:13 IST