शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचा नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 13:13 IST

खासदारांना निवेदन : बैठकीत विविध विषयांवर चर्चा

<p>नंदुरबार : इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे अनेक रुग्णांनी थेट जिल्हा, उपजिल्हा रुग्णालये व आरोग्य केंद्रांकडे धाव घेतली. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी झाली होती.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जिल्हा शाखेतर्फे देशव्यापी संपात सहभाग घेतला. असोसिएशनच्या सर्वच डॉक्टरांनी बाह्य रूग्ण विभाग शनिवारी बंद ठेवला होता. त्यामुळे अनेक रुग्णांना परत फिरून जावे लागत होते. डॉक्टर असोसिएशनतर्फे दोन दिवस आधीपासून संपाचे सुतोवाच करण्यात आलेले असतांनाही अनेक रुग्णांना त्याबाबत माहिती नव्हते. त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठय़ा रुग्णालयांमध्ये नंबर लावण्यासाठी सकाळपासूनच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती. परंतु बंद असल्याचे लक्षात आल्यावर रुग्ण माघारी फिरत होते. जिल्हा रुग्णालयांमध्ये यामुळे मोठी गर्दी झाली होती. ओपीडी सेक्शनमध्ये रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नेहमीपेक्षा अधीक काळ ओपीडी सुरू ठेवाव्या लागल्या होत्या.या कारणामुळे बंदनॅशनल मेडिकल कमिशन बील संसदेत विना चर्चेने पास करण्याचा शासनाचा डाव आहे. त्यात अनेक उणीवा आहेत. लोकशाहीविरोधी, भ्रष्टाचाराला चालना देणारे आहे. आयुष डॉक्टरांना मॉर्डन मेडिसीनची प्रॅक्टीस करण्याची मुभा राहणार आहे. खाजगी मेडिकल कॉलेज काढण्यासाठी नियम बनविण्यात आले आहेत परिणामी मनमानी वाढणार आहे. यामुळे भारतातील वैद्यकीय व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याला विरोध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन हा बंद आयोजित केला होता.खासदारांना निवेदनसंसदेत हे विधेयक येणार असल्यामुळे खासदार डॉ.हिना गावीत यांना असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. हे विधेयक पारीत होऊ देवू नये अशी विनंती यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. निवेदन देणा:यांमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी, सचिव डॉ.राजेश कोळी, रवींद्र पाटील, डॉ.शिरिष शिंदे, डॉ.राजकुमार पाटील, डॉ.विजय पटेल, डॉ.योगेश देसाई, डॉ.दिपक अंधारे, डॉ.विनय पटेल, डॉ.सुनील पाटील, डॉ.प्रसाद सोनार, डॉ.जयंत शहा, डॉ.दिपक पटेल, डॉ.युवराज पाटील, डॉ.वोरा आदी उपस्थित होते.