शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आदेशांचे उल्लंघन करू नका अन्यथा कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन न करता घरातच बसून रहावे व प्रशासनास मदत करावी. ठरवून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन न करता घरातच बसून रहावे व प्रशासनास मदत करावी. ठरवून दिलेल्या वेळेतच अत्यावश्यक सामान घेण्यासाठी घराबाहेर पडावे अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिला आहे.प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी आदींसह कर्मचाऱ्यांचे पथक शहरात गस्त घालून नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन करीत आहेत. पहिले दोन दिवस वगळता आता नागरिकांमध्ये हळूहळू प्रशासनाचे म्हणणे रुजत असल्याचे चित्र आहे. भाजीपाला विक्रीसाठीही शहरात ठिकठिकाणी सोय करण्यात आली असून नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.वाघ यांनी केले आहे.पोलिसांकडून गस्तसंचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले असून सकाळी बाजारपेठेत भाजीपाला, दूध, धान्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दिवसभरात पोलिसांकडून वाहनधारकांची चौकशी करून त्यांना माघारी पाठविण्यात आले. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना तंबीही देण्यात आली. दिवसभर पोलिसांकडून शहरात गस्त घालण्यात येत असून काहींना पोलिसांकडून ‘प्रसाद’ही दिला जात आहे. ही कारवाई होऊ नये म्हणून घरी थांबणे योग्य समजावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी केले आहे.प्रांताधिकाºयांचे आवाहनशहाद्यातील कष्टकºयांच्या सोयीसाठी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी पुढाकार घेत त्यांना मदत करण्यासाठी आवाहन केले आहे. रोजंदारीने उदरनिर्वाह करणाºया कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून गिरासे यांनी सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केले आहे. शासनाकडून मार्च व एप्रिल महिन्याचे धान्य मिळणार असले तरी सध्या इतर जीवनावश्यक वस्तू देणे आवश्यक आहे. अनेक स्वयंसेवी संघटना मदत करण्यासाठी इच्छुक असून सालदारनगर, शिवाजीनगर यासह इतर गरीब लोकांच्या वस्तीत गरजू कुटुंबांना किमान चार-पाच दिवस जीवनावश्यक वस्तूंची किट देणे योग्य ठरेल. दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संघटनांनी जर किट्स विकत घेऊन जमा केल्यास गरीब वस्तीत नगरपालिका प्रशासनामार्फत वाटप करण्याचे नियोजन करता येईल. नगरपालिकेची टीम तयार करून एका ठिकाणी किट्स जमा करुन स्वयंसेवी संस्थांचे एक दोन प्रतिनिधी व नगरपालिका कर्मचाºयांमार्फत ते वितरीत करता येईल. इच्छुकांनी मदत देण्यासाठी लक्ष्मण कोळी (मो.८३२९८१७०३३), संदीप टेंभेकर (मो.८६६९१३२७२३) व चेतन गांगुर्डे (मो.८२७५५६३९३९) या कर्मचाºयांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.