शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र जळाल्याने सुलतानपूर येथील दिवाळी अंधारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील रोहित्र गेल्या चार दिवसापासून जळाले असल्याने ऐन दिवाळीच्या उत्सवात गावात ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील रोहित्र गेल्या चार दिवसापासून जळाले असल्याने ऐन दिवाळीच्या उत्सवात गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीकडे नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत त्वरित नवीन रोहित्र बसवून ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रय} केला. मात्र तोही जळाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.दरम्यान, संबंधित वरिष्ठ अधिका:यांशी ग्रामस्थांनी पुन्हा संपर्क साधून याठिकाणी त्वरित उच्च क्षमतेचा नवीन रोहित्र बसवून देण्याची मागणी केली आहे. ऐन दिवसाळीच्या सणात गावात अंधाराचे साम्राज्य पसरल्याने येथील जनजीवनावर त्याचा परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. रोहित्राअभावी गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थ व मजुरांना पिण्याच्या  पाण्यासाठी मजुरीस मुकावे लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून याठिकाणी त्वरित उच्च क्षमतेचा रोहित्र उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामप्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देवून गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठांशी संपर्क साधून ऐन दिवाळीत गावावर परलेला काळोख दूर करण्यासाठी तत्काळ रोहित्र उपलब्ध करूण देण्याची मागणी करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.वीजपुरवठय़ाअभावी येथील शासकीय, निमशासकीय, व्यावसायिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अंधारात रस्त्यावरील गटारी व खड्डे दिसून येत नसल्याने किरकोळ अपघाताच्याही घटना घडत आहे. त्यामुळे संबंधित वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिका:यांनी ग्रामस्थांच्या सहनशीलतेची परीक्षा न घेता तत्काळ नवीन उच्च क्षमतेचे रोहित्र बसवून गावातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.