शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
2
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
3
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
4
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
5
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
6
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
7
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
8
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
9
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
10
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
11
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
12
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
13
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
14
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
15
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
16
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
17
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
18
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
19
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
20
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई

नंदुरबारात रेल्वे मजदूर संघाचा विभागीय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 19:06 IST

नंदुरबार : वेस्टर्न रेल्वे मजदूर संघातर्फे येत्या 7 जानेवारीला देशभरात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे ...

नंदुरबार : वेस्टर्न रेल्वे मजदूर संघातर्फे येत्या 7 जानेवारीला देशभरात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे महामंत्री जे.जी. माहूरकर यांनी दिली.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात मुंबई विभागाच्या विभागीय समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन जे.जी. माहुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शरीफ खान पठाण, अजयकुमार सिंह, मुरली अय्यर, श्रीकृष्ण मुणगेकर, चतुर गिरासे, राजेश पंदीरकर, मंडळ अध्यक्ष किरण पाटील, अमीन मिङरा, सुजीत भास्करन, पी.के. सिंह, रमेश जांगीड, रामनारायण राजीव शर्मा, यतीन शिंदे, बी.डी. परमार आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते एन.एफ.आय.आर. की कुछ महत्वपूर्ण उपलब्धिया या पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.माहुरकर पुढे म्हणाले की, रेल्वेचे 13 लाख 20 हजार कर्मचारी रेल्वेत काम करतात. रिक्त जागा भरल्या न गेल्याने या कर्मचा:यांना विश्रांती व सुटी मिळत नाही. ओव्हर टाईम काम करून घेतले जाते. देशात 24 तासात 12 हजार गाडय़ा दररोज मेल व एक्सप्रेस व सात हजार मालगाडय़ा चालवल्या जातात. रिक्त जागांमुळे कर्मचा:यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. 1 जानेवारी 2004 पासून लागू नवी पेन्शन योजना रद्द करून पूर्वीची योजना लागू करावी, ट्रॅकमन यांना उच्चस्तरीय कमिटीद्वारा निर्धारित ग्रेड पे 2800-10 टक्के 2400-20 टक्के, एक हजार 999 - 20 टक्के, एक हजार 800 - 50 टक्के त्वरित लागू करावी. रनिंग स्टॉफला किलो मीटर्स भत्ता एन.एफ.आय.आर.द्वारा सूचविलेला नवीन संशोधीत दर 648 पासून द्यावा. रेल्वेचे एक लाख 25 हजार ट्रॅकमन 77 हजार किलो मीटर्स नेटवर्क पाहतात. त्यांचे कामाची स्थिती खूप वाईट आहे. 10 ते 12 तास काम करावे लागते. अॅप्रेंटीसच्या कर्मचा:यांनाही लवकर सेवेत घेण्यासाठी सहा प्रय} करणार आहेत. या विविध मागण्यांसाठी येत्या 7 जानेवारी रोजी देशभरात धरणे आंदोलन करणार आहेत. यात सात ते आठ लाख कर्मचारी सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी शरीफखान पठाण, अजयकुमार सिंह यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक चुतर गिरासे व राजेश पंदीरकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिता सातपुते तर आभार किरण पाटील यांनी मानले. सुनील राजोरिया, रवींद्र पोतदार, विजय बत्तीसे, प्रदीप सिंह, एस.के. पांडे, रवींद्र तमायचेकर, सुनील पगारे, राकेश कडोसे, वासू वानखेडे, गणेश दीपचंद, राकेश चौधरी, प्रतापसिंग, अनिल हवालदार यांनी परिश्रम  घेतले.