शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शहादा महाविद्यालयात रंगणार जिल्हा युवक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि  येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 29 जानेवारी रोजी युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी 25 कलाप्रकारांचे सादरीकरण करणार आहेत.एकदिवसीय नंदुरबार जिल्हा युवक महोत्सवाची प्राचार्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि  येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 29 जानेवारी रोजी युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी 25 कलाप्रकारांचे सादरीकरण करणार आहेत.एकदिवसीय नंदुरबार जिल्हा युवक महोत्सवाची प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या वेळी संस्थेचे शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, उपप्राचार्य तथा आयोजन समितीचे प्रमुख डॉ.एम.के. पटेल उपस्थित होते. ‘युवक महोत्सव 2018’चे उद्घाटन 29 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या वेळी उमवि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक पी.आर. पाटील, प्राचार्य मकरंद पाटील यांची उपस्थिती राहील. या युवा महोत्सवासाठी महाविद्यालयातर्फे जय्यत तयारी करण्यात येत असून त्यासाठी विविध समिती गठीत करण्यात आल्या आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलगिAत 29 महाविद्यालयांचे 486 कलाकार विद्यार्थी 25 कला प्रकारांचे सादरीकरण करतील. पाच वेगवेगळ्या मंचावर कार्यक्रम सादर केले जाणार असून रंगमंच क्रमांक एक हा सूक्ष्मजीवशास्त्र प्रांगणात राहणार आहे. याठिकाणी विडंबन नाटय़, मूकनाटय़, मिमिक्री, समूह  लोकनृत्याचे सादरीकरण होईल. महात्मा गांधी सभागृहातील रंगमंच क्रमांक दोनवर भारतीय लोकगीते, सुगम गायन, समूह गीत, लोकसंगीत, पाश्चात्य सुगम गायनाचे सादरीकरण होईल. वामय भवनातील कक्ष क्रमांक 201 मध्ये रंगमंच क्रमांक तीनवर काव्यवाचन, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा होतील. रंगमंच क्रमांक चार सरविश्वेश्वरैया सभागृह अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राहणार असून तेथे शास्त्रीय गायन, वादन, सूरवाद्य, नृत्य, पाश्चात्य समूहगीतांचे सादरीकरण होईल. सरदार पटेल सभागृहातील रंगमंच क्रमांक पाचवर रांगोळी, फोटोग्राफी, ईस्टॉलेशन, व्यंगचित्र, स्पॉट पेंटींग, चित्रकला, प्ले मॉडेलिंग, कोलाज या कलाप्रकारांच्या स्पर्धा होतील, अशी माहिती प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी दिली.