जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात एकूण २ लाख ३१ हजार ११ जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. त्यापैकी ३७ हजार ७०० जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात ३६ हजार ७५० रुग्ण बरे झाले आहेत. तर ९५० जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक जिल्ह्यासाठी वेदानादायी ठरली होती. मात्र, ही लाटही निवळली आहे. गेल्या महिनाभरात केवळ एक आकडी रुग्णसंख्या आढळून आली. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या केवळ एक आहे. त्यातही तब्बल १२ दिवस एकही रुग्ण नव्हता. अर्थात हे १२ दिवस कोरोनामुक्त जिल्हा म्हणून राहिला. तथापि, दोन दिवसांपूर्वी एक रुग्ण आढळला आहे. त्याचीही लक्षणे सौम्य असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. या महिनाभराच्या काळात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात महिनाभरात कोरोनाचा एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST