शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना २७ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना देण्यात येणाºया पीक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना देण्यात येणाºया पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे़ यातून आतापर्यंत ४५ टक्के कर्जवाटप पूर्ण झाले असून ५५ टक्के कर्जाचे वाटपही जूनमध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे़एप्रिल महिन्यापासून जिल्हा बँकेने कर्जाचे वाटप सुरु केले आहे़ यातून आजअखेरीस २७ कोटी २९ लाख ४० हजार रुपयांचे पिक कर्ज वाटप झाले आहे़ जिल्ह्यात बँकेकडून विविध कार्यकारी संस्थांच्या मार्फत कर्जाचे वाटप करण्यात येते़ यातून आतापर्यंत २३५ पैकी १४५ संस्थांनी त्यांच्या सभासद शेतकºयांना कर्ज पुरवठा केल्याने शेतीकामांना वेग आल्याची माहिती आहे़ दरम्यान २ हजार ८४० खातेदारांना बँकेच्या जिल्ह्यातील २९ शाखांमधून कर्ज वाटप करण्यात आले आहे़ राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत यंदा बँकेने कर्ज वाटपाला वेग दिला असल्याने शेतकºयांना खरीप हंगामाचे नियोजन करणे सोपे झाले आहे़ यंदा बँकेने शेतकºयांची गर्दी टाळण्यासाठी रुपे कार्डच्या माध्यमातून कर्ज वाटप केले आहे़ यातून शेतकºयांना विविध कार्यकारी संस्था आणि बँकेच्या शाखेतून मोबाईलवर मेसेज देऊन वाटप करण्यात आलेल्या कार्डच्या माध्यमातून मंजूर केलेल्या कर्जाची माहिती मिळत आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कर्ज वितरणात अडचणी येण्याची शक्यता शेतकºयांनी वर्तवली होती़ परंतू याउलट स्थिती सध्या आहे़दुसरीकडे महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्जमाफी योजनेसह २०१७ नंतरच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीच्या याद्यांमध्ये नावे नसल्याने अनेक शेतकºयांना कर्ज मिळण्यास येणाºया अडचणी कायम आहेत़ मागील थकीत रक्कम जैसे थे असल्याने शेतकºयांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत़ जिल्हा बँकेत गेल्या वर्षाच्या परतावा देणारे शेतकरी आणि संस्था यांना प्रथम प्राधान्याने कर्ज दिले जात आहे़ जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेत कर्जमागणी करणाºया शेतकºयांना नाहकरत प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रे मिळण्यास अडचणी येत असल्याने शासनाने कर्जमाफीच्या याद्या देऊन पीक कर्ज मिळण्याचा अडसर दूर करण्याची मागणी केली आहे़आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात ६० संस्था व १ हजार १९७, शहादा ५९ संस्था व १ हजार २३२ शेतकरी, तळोदा १० संस्था १२८ शेतकरी, अक्कलकुवा १ संस्था १८ शेतकरी तर नवापुर तालुक्यात १५ संस्था व २६५ सभासद शेतकरी यांना कर्ज देण्यात आले आहे़ शेतकºयांना देण्यात आलेल्या या कर्जामुळे जिल्ह्यातील ४ हजार ५४६ क्षेत्र संरक्षित करण्यात आले असल्याची माहिती आहे़