कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कांतीलाल टाटिया, महात्मा जोतिबा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी, वडाळी पीक संरक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रकाश जगताप, कोंढावळ येथील देवराम माळी, अक्षय माळी, निंभोराचे सरपंच रामचंद्र ठाकरे, खापरखेडाचे सरपंच प्रताप भिल, फेस येथील मणिलाल पाटील, बोराळा-मातकूटचे उपसरपंच बापू पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच व उपसरपंच उपस्थित होते. यावेळी आ. डॉ. गावित म्हणाले की, धांद्रे खुर्द ते उभादगड- जयनगरपर्यंत या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल. आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळाले आहेत; परंतु बिरसा मुंडा योजनेंतर्गत अद्यापही विहिरींची प्रकरणे प्रलंबित असून तेही मार्गी लावण्यात येतील. यासह विजेची समस्या, जि.प. शाळेला सोलर सिस्टीम बसविण्यात येईल, असे सांगून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डॉ. कांतीलाल टाटिया यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ईश्वर माळी यांनी केले. सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक एम.एस. बर्डे यांनी केले, तर आभार श्रीकांत जगताप यांनी मानले. कार्यक्रमासाठी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पाटील, इरफान पठाण आदींनी परिश्रम घेतले.
धांद्रे खुर्द येथे पात्र लाभार्थींना रेशन कार्ड वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST