यावेळी आमदार डाॅ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी, पंचायत समिती सभापती बायजाबाई भिल, सुप्रिया गावित, डाॅ. कांतीलाल टाटिया, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सीमा सोनगिरे, पंचायत समितीच्या सदस्य गणेश पाटील, नगरसेवक संदीप शंकर पाटील, संजय साठे, संतोष वाल्हे, किरण पावरा, आदी उपस्थित होते
कार्यक्रमात दिव्यांगांना कृत्रिम अंग तसेच ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले. यात व्हीलचेअर, कुबड्या, चष्मे, श्रवणयंत्र, स्मार्टफोन, वाॅकरसह अन्य साहित्याचा समावेश होता. शहादा तालुक्यातील एकूण ४०० जणांना साहित्य वाटप करण्यात आले. जिल्ह्यात एक हजार लाभार्थ्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून, येत्या काळात त्यांना हे साहित्य दिले जाणार आहे.
यावेळी बोलताना खासदार डाॅ. हीना गावित यांनी दिव्यांग व्यक्तींचा जिल्हाभरात पारदर्शक पद्धतीने सर्व्हे करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींना काय लागेल याची माहिती भरून घेण्यात आली आहे. येत्या आठवड्यात जिल्ह्यात साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. विष्णू जोंधळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.