शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील हातावर पोट भरणाऱ्या मजुरांंवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना शहरातील स्वयंसेवी संस्था, ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील हातावर पोट भरणाऱ्या मजुरांंवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना शहरातील स्वयंसेवी संस्था, राजकीय पदाधिकारी, तरुणांकडून मदत केली जात असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असल्याने मजुरांना कामावर जाणे अवघड झाले आहे. विशेषत: ज्यांचे हातावर पोट भरते त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर तळोदा शहरातील तरुणांचे काही सामाजिक ग्रुप, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांना अन्न, धान्याचे पाकीट, भाजीपाला, किराणा माल देऊन मदत करीत आहेत. आमदार राजेश पाडवी हे स्वत: शेजारच्या गुजरात राज्यात व नाशिक जिल्ह्यात रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या मजुरांची वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना वाहनाची व्यवस्था करुन आपआपल्या गावाकडे रवाना करीत आहेत.भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांनीही शहरातील गरीब, निर्वासीत वस्तीत पीठ, दाळ, तांदूळ व इतर जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या. या वेळी प्रा.विलास डामरे, गुलाबराव चव्हाण, जगन्नाथ मराठे, अभिषेक मालपुरे, अंबालाल साठे, भीमा महाले, भूषण येवले आदी उपस्थित होते. तसेच अक्कलकुवा तालुक्यातील जांबीपाणी या दुर्गम भागातील गावात डॉ.वाणी यांच्याकडून गावातील १५२ कुटुंबाना प्रत्येकी पाच किलो गव्हाचे पीठ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीदिनी संपूर्ण शहरात १० हजार साबण व मास्क वाटप केले. उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, भाजपचे शहराध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, पालिका सभापती अंबिका शेंडे यांनी नागरिकांना सुरक्षेसाठी मास्क उपलब्ध करून दिले. तरुणांच्या सोशल ग्रुपतर्र्फेे फुटपाथवरील बेघर असलेल्यांना रोज दोन्ही वेळचे जेवण व गरजूंना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शहरात अनेक हात गरीबांच्या मदतीसाठी सरसावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.