शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

केदारेश्वर प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यातील मान्यवरांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केदारेश्वर प्रतिष्ठान पुणेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या स्नेहमिलन समारंभात जिल्ह्यातील गुजर समाजातील विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केदारेश्वर प्रतिष्ठान पुणेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या स्नेहमिलन समारंभात जिल्ह्यातील गुजर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. दरम्यान या वेळी प्रतिष्ठानतर्फे गुर्जर मित्र पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरधर संभू पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषाताई ढोरे, जीसीसीएचे अध्यक्ष आर.वाय. पाटील, विएसजीजीएमचे अध्यक्ष मोहन पटेल, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हेमलता पाटील व कार्याध्यक्ष प्रकाश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा व समाजबांधवांचा समाज भूषण, समाज गौरव व समाजसेवक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.समाज गौरव पुरस्काराने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सरदार पटेल शिक्षण संस्था नंदुरबार, कला व साहित्य क्षेत्रात हेमलता शरद पाटील, शैक्षणिक क्षेत्रात डॉ.संजयकुमार लिमजी पाटील, उद्योग क्षेत्रात जगदीश हरी पटेल, वैद्यकीय क्षेत्रात धुळे येथील डॉ.प्रशांत गणेश पाटील, कृषी क्षेत्रात गौतम भगवान पाटील, क्रीडा क्षेत्रात मेहुल शरद पटेल यांना गौरविण्यात आले. तसेच शोभनाताई झिपरू पाटील वीर गुजर सन्मान संदीप कृष्णा पटेल यांना तर आदर्श विधवा माता सन्मान उषाबाई पूनमचंद पटेल यांना देण्यात आला.सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्यासाठी कै.अ‍ॅड.बी.बी. पटेल उत्कृष्ट समाजसेवक पुरस्काराने पटेल सोशल ग्रुप या संस्थेला व डॉ.राकेश एकनाथ पाटील यांना तर कै.विजय नरोत्तम पाटील उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार जयेश माणक पटेल व धनंजय राजाराम पाटील यांना प्रदान करण्यात आला.कै.राजेंद यशवंत पाटील गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने अंध असूनही नेत्रदीपक यश प्राप्त केलेल्या सातुर्खे, ता.नंदुरबार येथील गिरीष संजय पटेल या विद्यार्थ्याला सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना रमण हरी चौधरी गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी पुणे, मुंबई व पिंपरी चिंचवड शहरातील लेवा गुजर समाजबांधवांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.पारंपरिक भजन महोत्सवाने समारंभाची सुरूवात करत आपल्या सुंदर भजन रचनांनी प्रसिद्ध बासुरीवादक कन्हैयालाल पटेल, गायक डॉ.बिपिन पाटील, हार्मोनियम वादक संदीप पाटील तसेच तबलावादक विपुल पाटील यांच्यासह सर्व वाद्यवृदांनी भजन व भावगीते सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.या वेळी गुजर मित्र या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून केदारेश्वर प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय भाषणात गिरधर पाटील यांनी संपूर्ण दिवसातून किमान दोन चांगली कामे करा, तेच पुण्य आहे, स्वर्ग कोणी पाहिला, इथेच आहे असे संबोधन करत केदारेश्वर प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या.प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हेमलता पाटील व संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा मांडला. कार्यक्रमासाठी कार्यकारिणी मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय पाटील तसेच सिनेअभिनेता संदीप साकोरे यांनी तर आभार सचिव मोतीलाल पाटील, पी.यु. पाटील यांनी मानले.गुजरातमधील सुमूल डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी झटणारे वेळदा, ता.निझर येथील ज्येष्ठ समाजसेवक कै सुदाम रघुनाथ पटेल, व पुष्पदंतेश्वर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कै.मोहनभाई उर्फ प्रल्हाद भाईदास चौधरी कलसाडी यांना प्रतिष्ठनतर्फे या वेळी समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या परिवारातर्फे हा पुरस्कार स्किारण्यात आला.