शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी येथे 60 टन चारा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : अतिवृष्टीमुळे वडाळी येथील रंगूमती नदीला आलेल्या महापुराने नदीकाठावरील भरवाड कुटुंबांचे सुमारे 10 ते 12 ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : अतिवृष्टीमुळे वडाळी येथील रंगूमती नदीला आलेल्या महापुराने नदीकाठावरील भरवाड कुटुंबांचे सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या कुटुंबांच्या गुरांसाठी फेस, ता.शहादा येथील गणराज शेतीमाल उत्पादक गटाने 60 टन चारा उपलब्ध करून दिला.वडाळी येथील रंगूमती नदीकाठावर सहा भरवाड कुटुंबांचे वास्तव्य आहे. अतिवृष्टीने नदीला आलेल्या महापुरात या कुटुंबांचे ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, धान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य, गुरांसाठी साठवलेल्या चा:यासह 15 ते 20 गायीचे वासरु व म्हशीचे 20 पारडू वाहून गेले. या भरवाड कुटुंबाला मदतीचा हात द्यावा म्हणून फेस येथील गणराज शेतीमाल उत्पादक गटाने सुमारे 60 टन चारा उपलब्ध करून दिला. या वेळी जि.प. सदस्य जयपालसिंह रावल, सारंगखेडय़ाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पं.स. सदस्य गिरीश जगताप, सरपंच रामू भिल, उपसरपंच हिंमत सोनवणे, गणराज शेतीमाल उत्पादक गटाचे अध्यक्ष सुरेश पाटील, संचालक रमेश पाटील, तलाठी महेश ठाकरे आदी उपस्थित होते.या वेळी जयपाल रावल म्हणाले की, पूरग्रस्त भरवाड कुटुंबांना आवश्यक त्या मदतीसाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. या कुटुंबांना घरकूल योजनेचा लाभ व पुरात वाहून गेलेल्या गुरांच्या पंचनाम्याबाबतही जाचक अटी शिथील करण्यासाठी प्रय} करणार असल्याचे सांगून गणराज शेतीमाल उत्पादक गटाने केलेल्या मदतीचे कौतुक केले. सुरेश पाटील म्हणाले की, पूरग्रस्त कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे असलेल्या गुरांसाठी 60 टन चारा उपलब्ध करून देण्याचा निर्णय गटातील पदाधिका:यांना एकमताने घेतला. गटातर्फे परिसरातील   पूरग्रस्त भागातही 50 ते 60 टन चारा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. आभार रमेश पाटील यांनी मानले.दरम्यान, गणराज शेतीमाल उत्पादक गटाने गुरांसाठी आवश्यक असलेला चारा उपलब्ध करून दिल्याने पूरग्रस्त भरवाड कुटुंबांनी गटाचे आभार मानून शासनाने आम्हाला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.